गयाना : भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी-२०मध्ये वेस्ट इंडिजला १४६ रनपर्यंत मजल मारता आली. वेस्ट इंडिजचा स्कोअर २० ओव्हरमध्ये १४६/६ एवढा झाला. नवदीप सैनीच्या शेवटच्या ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजने १६ रन केल्यामुळे त्यांना या स्कोअरपर्यंत मजल मारता आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेणाऱ्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली. खलील अहमदऐवजी टीममध्ये आलेल्या दीपक चहरने वेस्ट इंडिजला लागोपाठ ३ धक्के दिले. वेस्ट इंडिजची अवस्था १४/३ अशी झाली होती. यानंतर कायरन पोलार्ड आणि निकोलास पूरन यांनी वेस्ट इंडिजचा डाव सावरला. 


कायरन पोलार्डने ४५ बॉलमध्ये ५८ रन केले. तर रोव्हमन पॉवेलने २० बॉलमध्ये नाबाद ३२ रन केले. भारताकडून दीपक चहरने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या, तर नवदीप सैनीला २ आणि राहुल चहरला १ विकेट मिळाली. या मॅचमध्ये टीम इंडियाने ३ बदल केले. रवींद्र जडेजाऐवजी लेग स्पीनर राहुल चहर, रोहित शर्माऐवजी केएल राहुल आणि खलील अहमदऐवजी दीपक चहरला संधी देण्यात आली. 


पहिल्या दोन टी-२० मॅचमध्ये विजय मिळवल्यानंतर आता तिसरी मॅच जिंकून वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरली आहे. पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा ४ विकेटने आणि दुसऱ्या मॅचमध्ये २२ रननी विजय झाला होता.