श्रीलंकेविरुद्ध पहिल्या डावात भारत पाचशेपार
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने पाचशे धावांचा टप्पा गाठलाय. सात गड्यांच्या मोबदल्यात भारताने पाचशेपार धावसंख्या उभारलीये.
कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने पाचशे धावांचा टप्पा गाठलाय. सात गड्यांच्या मोबदल्यात भारताने पाचशेपार धावसंख्या उभारलीये.
भारताकडून वृद्धिमन साहा ४२ धावांवर तर रवींद्र जडेजा २ धावांवर खेळतोय. गुरुवारी भारताच्या चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी केलेल्या प्रत्येकी शतकी खेळीमुळे भारताने सव्वातीनशेचा टप्पा पार केला होता.
त्यानंतर आजच्या अर्ध्या दिवसात आणखी दीडशेहून अधिक धावांची भर घालण्यात आली. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला चेतेश्वर पुजारा झटपट बाद झाला. त्याने १३३ धावा केल्या. तर रहाणेला १३२ धावा करता आल्या.
आर. अश्विनने ५४ धावांची खेळी केली. दुसऱ्या दिवशी आतापर्यंत श्रीलंकेला ४ गडी बाद करता आले.