मुंबई : भारतीय क्रिकेट संघ लवकरच कसोटी मालिकांची सुरुवात करण्यासाठी सज्ज होणार आहे. टी20 सामन्यामध्ये क्लीन स्वीप नावे केल्यानंतर आता, हा संघ कसोटीमध्ये दमदार कामगिरी करतो का; याकडेच सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. दोन कसोटी सामन्यांची सुरुवात 4 मार्चपासून होणार आहे. पहिला कसोटी सामना मोहाली आणि दुसरा सामना बंगळुरू इथं खेळवला जाणार आहे. (Virat Kohli Ind vs SL)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यांसाठी विराट कोहलीवर सर्वांच्याच नजरा आहेत. कारण हा सामना त्याच्या कारकिर्दीतील अतिशय महत्त्वाचा असल्याचं सांगण्यात येत आहे.


आतापर्यंतच्या कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना तो मोहालीमध्ये खेळणार आहे. ज्यासाठी संघातील माजी खेळाडूनं विराटबाबत मोठा दावा केला आहे.


सुनील गावस्कर यांचं विराटला मोलाचं सांगणं...


मागील 2 वर्षांपासून विराटनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक लगावलं नाही. 2019 मध्ये त्यानं शेवटची शतकी खेळी केली. त्यावेळी भारतीय संघाचा सामना बांगलादेशसोबत खेळवण्यात आला होता.


इथं विराटनं शतकी खेळी न केल्यामुळं आता थेट त्यानं कारकिर्दीतील 100 व्या कसोटी सामन्यामध्ये दमदार 100 धावा कराव्यात आणि हा दुष्काळ संपवावा असा जणू आग्रहच केला आहे.


माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, ‘आशा करतो की तो 100 वा कसोटी सामना शतकी खेळीनं साजरा करेल. कोणत्याही भारतीय फलंदाजानं असं केलेलं नाही. असं करणारे कॉविड कॉवड्रे हे पहिले खेळाडू होते.


जावेद मियांदाद आणि एलेक्स स्टीवर्ट यांनीही असं केलं होतं.’, असं म्हणत विराटकडून आपल्याला खूप अपेक्षा असल्याचं गावस्कर म्हणाले.


विराटची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी थोडक्यात...


2011 मध्ये विराटनं कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. 11 वर्षांच्या आतापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीत त्यानं 99 सामने खेळले. ज्यामध्ये 50.39 च्या सरासरीनं त्यानं 7962 धावा केल्या. यादरम्यान त्यानं 27 शतकं  आणि 28 अर्धशतकं ठोकली.


 


7 द्विशतकी खेळीही त्याच्या नावे आहेत. त्यामुळं आता खरंच त्यानं 100 व्या कसोटीमध्ये शतक ठोकल्यास असं करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे.