World Cup 2023 Final India Loss Babar Azam Reacts: वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघाने यजमान भारतीय संघाला 6 विकेट्सने पराभूत केलं. भारताचा हा पराभव 140 कोटी भारतीयांच्या जिव्हारी लागला असून मैदानामध्ये कर्णधार रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजबरोबर के. एल. राहुल आणि इतर खेळाडूंनाही अश्रू अनावर झाल्याचं चित्र रविवारी सायंकाळी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाहायला मिळालं. भारताने या स्पर्धेत सर्वच्या सर्व 10 सामने जिंकले होते. मात्र अंतिम सामन्यात त्यांना पराभवाचं तोंड पहावं लागलं ते ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने केलेल्या शतकामुळे. भारतीय संघ पराभूत झाल्यानंतर लगेच पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझमने इन्टाग्राम स्टोरीवरुन पहिली प्रतिक्रिया दिली. बाबर हा या सामन्यावर प्रतिक्रिया देणाऱ्या पहिल्या काही मोजक्या क्रिकेटपटूंपैकी एक ठरला.


गोल्फमध्ये रमला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंतिम सामन्याच्या दिवशी बाबर आझम गोल्फचा आनंद घेत होता. त्याने यासंदर्भातील फोटोही आपल्या इन्स्टाग्रामवरुन पोस्ट केले.



2)



बाबरला द्यावा लागला राजीनामा


बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाने वर्ल्ड कप 2023 मध्ये सुमार कामगिरी केली. पाकिस्तानी संघ साखळी फेरीतच स्पर्धेतून बाहेर पडला. पाकिस्तानी संघ पाचव्या स्थानी राहिला. या स्पर्धेनंतर मायदेशी परतल्यावर बाबरने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.


अंतिम सामन्यात नेमकं काय घडलं?


ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्याने अनेकांनी आश्चर्य वाटलं. भारताने नेहमीप्रमाणे या सामन्यालाही दमदार सुरुवात केली. रोहित शर्माने त्याच्या आक्रमक शैलीमध्ये फटकेबाजी केली. मात्र शुभमन गिल स्वस्तात परतल्यानंतर रोहित शर्माही अर्धशतकापासून 3 धावा दूर राहिला. रोहित शर्मा ग्लेन मॅक्सवेलला षटकार मारण्याच्या नादात 47 वर बाद झाला. रोहित बाद झाल्यानंतर धावांचा वेग मंदावला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी अहमदाबदच्या वापरलेल्या खेळपट्टीचा पूर्ण वापर केला. विराट कोहली आणि के. एल. राहुल या दोघांनाही अर्धशथकं झळकावली. मात्र त्यांनी फारच संथ खेळ केल्याची टीका सोशल मीडियावरुन होताना दिसतेय. सूर्यकुमार यादवलाही या सामन्यात विशेष चमक दाखवता आली नाही. तळाचे फलंदाज कुलदीप यादव आणि सिराज यांनी तळाशी फलंदाजी करताना काही फटकेबाजी केल्याने भारताचा स्कोअर 240 पर्यंत पोहोचला.


...अन् ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला


भारतीय गोलंदाजांनी उत्तम सुरुवात केली. 47 धावांवर ऑस्ट्रेलियाचे 3 गडी तंबूत परतले होते. मात्र ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबूशेनने 192 धावांची पार्टनरशीप केली. हेडने शतक झळकावत वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा 7 वा खेळाडू होण्याचा मान मिळवला. भारताचा 6 विकेट्सने पराभव करुन ऑस्ट्रेलियन संघ 6 व्यांदा विश्वविजेता ठरला. ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप, अॅशेज आणि टी-20 वर्ल्ड कपही जिंकला आहे.