आशिया कप (Asia Cup 2022) स्पर्धेनंतर क्रिकेट प्रेमींना टी20 विश्वचषक स्पर्धेची उत्सुकता लागली आहे . ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) टी20 वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेसाठी सर्व संघांनी जय्यत तयारी सुरु केली आहे.  बीसीसीआयने  टी20 वर्ल्डसाठी संघ जाहीर केला आहे. (Team India Squad for T20 World Cup)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकची (Dinesh Karthik) पुन्हा एकदा टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाली आहे. 2007 मध्ये झालेल्या पहिल्या T20 विश्वचषकातही तो भारतीय संघाचा भाग होता. आयपीएल 2022 मध्ये दमदार खेळामुळे त्याने यावर्षी पुन्हा भारतीय संघात स्थान मिळवले आणि आता त्याची टी-20 वर्ल्ड कपमध्येही निवड झाली आहे. 


आयसीसी टी20 विश्वचषक 2022 साठी (ICC T20) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून दिनेश कार्तिकला त्यात स्थान मिळाले आहे. संघात निवड झाल्यानंतर दिनेश कार्तिकची प्रतिक्रियाही समोर आली आहे. दिनेश कार्तिकचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यातच अष्टपैलू हार्दिक पांड्याने (hardik pandya) त्याच्या ट्विटवर दिलेल्या उत्तराने सर्वांचीच मने जिंकली आहेत.


दिनेश कार्तिकने ट्विटरवर, 'स्वप्न पूर्ण होतात' असं म्हटलं आहे. यासोबत त्याने ब्लू हार्टही बनवले आहे. कार्तिकच्या पोस्टवर कमेंट करताना पांड्याने ‘चॅम्पियन’ असं लिहिले. 



दिनेश कार्तिकचा आयपीएल 2022 पासून आतापर्यंतचा प्रवास खूप खास आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने डीकेला विकत घेतले आणि या खेळाडूने फिनिशरच्या भूमिकेत चमकदार कामगिरी केली. त्यानंतर त्याला भारताच्या संघातही स्थान देण्यात आले आहे. दिनेश कार्तिकने 2004 मध्ये करिअरला सुरुवात केली. 2007 च्या T20 विश्वचषकानंतर त्याला एकही T20 विश्वचषक खेळण्याची संधी मिळालेली नाही.


T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ - 


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, आर पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, बी. कुमार हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.


स्टँडबाय खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर