केप टाऊन : टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला 26 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. एकूण 3 सामन्यांची ही मालिका असणार आहे. त्याआधी टीम इंडियासाठी चांगली बातमी समोर आली आहे. तर आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. आफ्रिकेच्या स्टार खेळाडूला दुखापत झाली आहे. (india tour of south africa south africa faster bowler anrich nortje ruled out of test series due to injurey)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नोर्तजेला दुखापतीमुळे या कसोटी मालिकेला मुकावं लागलं आहे. तसेच नोर्तर्जेच्या जागी दुसऱ्या कोणत्याही खेळाडूला संघात सहभागी केलं गेलेलं नाही, अशी माहिती आफ्रिका क्रिकेट बोर्डाने ट्विटद्वारे दिली आहे.


नोर्तजेने आतापर्यंत एकूण 12 कसोटी सामन्यांमध्ये 47 विकेट्स घेतल्या आहेत.  नोर्तजे घातक गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने आयपीएलच्या 14  व्या मोसमात सर्वात वेगाने बॉल टाकला होता. नोर्तजे संघाबाहेर गेल्याने आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. 


तर दुसऱ्या बाजूला नोर्तजे बाहेर पडल्याने टीम इंडियासाठी काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.   


कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघ


टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल (उप-कर्णधार), प्रियांक पांचाल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज.


राखीव खेळाडू- नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चाहर आणि अरजान नगवासवाला.


आफ्रिकन टीम 


डीन एल्गर (कर्णधार), टेम्बा बावुमा (उपकर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), कगिसो रबाडा, सारेल एरवी, ब्यूरन हेंड्रिक्स, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, लुंगी एन्गिडी, एडन मार्कराम, विआन मुल्डर, एनरिक नॉर्तजे, कीगन पीटरसन, रॅसी व्हॅन डुर डुसेन, कायल वेरेन, मार्को जॅन्सन, ग्लेंटन स्टुअरमन, प्रिनेलन सुब्रेन, सिसांडा मॅगाला, रायन रिकेल्टन आणि डुआन ऑलिव्हियर.  


कसोटी मालिकेचं वेळापत्रक 


पहिला सामना, 26-30 डिसेंबर,  सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन.  


दुसरा सामना, 3-7 जानेवारी 2022, इम्पीरियल वांडरर्स, जोहान्सबर्ग.  


तिसरा सामना,  11-15 जानेवारी 2022,  केपटाऊन.