India vs Afganistan : स्टेडियममध्ये दिसली अफगाण जलेबी, फोटो होतायत व्हायरल
विराटचं शतक राहीलं बाजूला, अफगाण तरूणीचं बनली चर्चेचा केंद्रबिंदू, कोण आहे ही तरूणी?
दुबई : आशिया कप (Asia cup 2022) स्पर्धेतील सुपर 4 मधला अफगाणिस्तानविरूद्धचा शेवटचा सामना टीम इंडियाने 101 धावांनी जिंकला. या विजयासह टीम इंडिया आणि अफगाणिस्तान (India vs Afganistan) संघाचं आशिया कपमधल आव्हान संपुष्ठात आलं. दरम्यान टीम इंडियाने जरी आशिया कपवर नाव कोरलं नसलं तरी विराटला सुर गवसला असल्याचा क्रिकेट फॅन्सना आनंद आहे.
टीम इंडियाचा अफगाणीस्तानविरूद्धचा सामना खुप खास होता. कारण या सामन्यात विराट कोहलीने (virat kohli) फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले. कोहलीने या सामन्यात नाबाद 122 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीत त्याने 12 फोर आणि 6 सिक्स ठोकले. ही स्फोटक खेळी करून त्याने कारकिर्दीतील 71वे शतक तर पूर्ण केलं. दरम्यान यावेळी तो सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज ठरला.
अफगाणीस्तानविरूद्धच्या सामन्यात विराटसह (virat kohli) आणखीण व्यक्ती चर्चेत आली होती. ही व्यक्ती कोणतीही खेळाडू नाही तर एक अफगाण तरूणी आहे. या तरूणीला पाहून क्रिकेट फॅन्स तिला अफगाण जलेबी म्हणतात. त्यामुळे ही व्यक्ती कोण आहे याची चर्चा सुरु झाली आहे.
कोण आहे 'ती' तरूणी?
या तरूणीचं नाव वाझमा अयुबी आहे. ही तरूणी अफगाणीस्तानची आहे. अफगाणीस्तान संघाला सपोर्ट करण्यासाठी ती सामना पाहायला आली होती. स्टेडीयममध्ये अनेक कॅमेरात ती कैद झाली होती. त्यामुळे अनेकांनी सामन्या दरम्यान ही तिला पाहायलं असेल. मात्र सामना संपल्यानंतर तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे तिचे फोटो पाहून क्रिकेट फॅन्स तिला अफगाण जलेबी म्हणतायत. विराटने अफगाणीस्तानविरूद्धच्या सामन्यात शतक ठोकलं असलं तरी सर्वत्र चर्चा या अफगाण जलेबीचीच होती.
विराट कोहलीच्या (virat kohli) नाबाद 122 धावांच्या बळावर टीम इंडियाने अफगाणिस्तानसमोर 213 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ 8 गडी गमावून केवळ 111 धावाच करू शकला. अशाप्रकारे टीम इंडियाने आशिया कप 2022 मधला शेवटचा सामना जिंकला आहे