कोलकाता : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळण्यात आलेल्या दुसऱ्या वन-डे मॅचमध्ये एक मोठी दुर्घटना टळली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकाता येथे सुरु असलेल्या दुसऱ्या वन-डे मॅचमध्ये हार्दिक पांड्या थोडक्यात बचावला आहे. झालं असं की, मॅचमध्ये ४७वी ओव्हर नाईल टाकत होता. नाईलच्या बॉलिंगवर भुवनेश्वर कुमारने शॉट मारला. भुवीने मारलेल्या शॉटनंतर तो बॉल थेट जाऊन पांड्याच्या हेल्मेटला धडकला.


भुवनेश्वर कुमारने मारलेला बॉल आपल्याकडे येत असल्याचं पाहून पांड्या खाली वाकला मात्र, तो बॉल पांड्याच्या हेल्मेटला धडकला. बॉल पांड्याच्या हेल्मेटला लागताच तो थेट जमिनीवर झोपला.



या घटनेनंतर टीम इंडियाचे डॉक्टर तात्काळ मैदानात दाखल झाले आणि त्यांनी हार्दिक पांड्याची तपासणी केली. मॅच शेवटच्या टप्प्यात असल्याने पांड्याने मैदानात खेळण्याचा निर्णय घेतला. पांड्याने या मॅचमध्ये ३५ बॉल्समध्ये २० रन्स केले.