नवी दिल्ली : क्रिकेटच्या विश्वातील सर्वात यशस्वी आणि अनुभवी क्रिकेटरांपैकी एक असलेल्या धोनीकडून दुस-या टी-२० सामन्यात एक चूक झाली आहे. रिव्ह्यू सिस्टम म्हटला जाणा-या धोनीने डीआरएस दरम्यान एक मोठी चूक केलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामन्यात ५व्या ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमारच्या बॉल मोसेस हेनरीकेच्या बॅटला लागून गेला. स्लिपमध्ये असलेल्या विराटने अपील सुद्धा केली. पण धोनीने अपील केली नाही. 


त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने धोनीला डीआरएस घेण्य़ाबाबत विचारले तर धोनीने नकार दिला. धोनीला वाटलं बॉल बॅटला लागलाच नाही. पण काही वेळाने स्निकोमीटर दाखवलं गेलं त्यात बॉल बॅटला लागून गेल्याचं स्पष्ट झालं. मोसेस हेनरीकेला मिळालेल्या या जीवदानामुळे त्याने नंतर ट्रेविस हेडसोबत केलेल्या विजयी शतकी भागीदारी केली. 



दरम्यान, दुस-या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने हेनरिक्सच्या शानदार अर्धशतकाच्या मदतीने भारताला ८ विकेटने मात दिली. ऑस्ट्रेलियन बॉलर्सनी दमदार प्रदर्शन करत भारताच्या दिग्गज बॅट्समनला केवळ ११८ रन्सवर तंबूत परत पाठवले. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सन्मान चार विकेट घेणा-या जेसन बेहरेनडॉर्फला मिळाला.