मेलबर्न : भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) दुसऱ्या कसोटी ( India vs Australia Test) सामन्यात ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. पहिल्या कसोटीत पराभव झाल्यानंतर दुसऱ्या कसोटी क्रिकेटमध्ये (India vs Australia, 2nd Test) चांगली कामगिरी केली. मुंबईकर अजिंक्य राहाणे (Ajinkya Rahane) यांने चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या कामगिरीबद्दल समालोचकांनी कौतुक केले आहे. टीम इंडियाला जिंकण्यासाठी ७० धावांची गजर होती. दोन गड्यांच्या मोबदल्यात भारताने हा विजय संपादन करत कसोटी मालिकेत बरोबरी साधली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज ऑस्ट्रेलियाचा संघ झटपड गुंडाळला गेला. भारतीय (India) संघाला चौथ्या दिवशी विजयाची संधी चालून आली. चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे खेळाडून झटपट बाद झालेत. ऑस्ट्रेलियाने काल तिसऱ्या दिवशी केवळ २ धावांची आघाडी घेतली होती. आता भारतीय गोलंदाज ऑस्ट्रेलियाच्या तळातील फलंदाजांना किती लवकर बाद केले. 


भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) दरम्यान जाहीर झालेल्या बॉक्सिंग डे कसोटीच्या (Boxing Day Test) चौथा दिवशी रंगत अधिक वाढलेली दिसून येत होती. यात भारताने बाजी मारल्याचे दिसून येत आहे. चौथ्या दिवशी दुसर्‍या डावात यजमान ऑस्ट्रेलायाला भारताने २०० धावांत गुंडाळले.


ऑस्ट्रेलियासाठी नाथन लॉयन जास्त धावा करु शकला नाही आणि मोहम्मद सिराजने त्याला ऋषभ पंतच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. नाथन लॉयनने केवळ ७ धावा केल्या.  दुसऱ्या डावात भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वधिक ३ आणि बुमराह, अश्विन, जडेजा यांनी प्रत्येकी २ तर यादवने एक बळी घेतला. बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २०० धावात संपुष्टात आला.  


दुसर्‍या डावात ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करणारा कॅमेरून बाद झाल्यानंतर ऑस्ट्रोलियाला आपला डाव सावरता आला नाही. त्याला मोहम्मद सिराजने ४५ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर माघारी पाठवले. चौथ्या दिवशी टीम इंडियाला पहिले यश जसप्रीत बुमराहने दिले. त्याने २२ च्या वैयक्तिक स्कोअरवर पॅट कमिन्सला पुन्हा पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तर कॅमेरून ग्रीन आणि पॅट कमिन्स यांच्यातील ५७ धावांच्या महत्त्वपूर्ण भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाला भारताविरूद्ध आघाडी घेता आली. 


ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात सहाव्या क्रमांकावर खेळायला आलेल्या कॅमेरून ग्रीनने लढत दिली. ग्रीनने सर्वाधिक म्हणजे ४५ धावा केल्या. तर थ्यू वेडने त्या खालोखाल म्हणजे ४० धावा केल्या. सातव्या विकेटसाठी ग्रीन आणि कमिन्सने ५७ धावांची पार्टनरशीप केली. यात कमिन्सचा वाटा होता २२ धावांचा. गोलंदाजना अजिबात साथ न देणाऱ्या या खेळपट्टीवर ही पार्टनरशीप भारताची चिंता वाढवत होती. अखेर नवा चेंडू घेतल्यावरच ही पार्टनरशीप मोडीत काढण्यात टीम इंडिला यश आले.