IND vs AUS 3rd T20: अशी असणार टीम इंडियाची Playing XI, ऋषभ पंतला संधी मिळणार?
तिसरा सामना जिंकत ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्यासाठी दोन्ही संघ सज्ज
IND vs AUS 3rd T20: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज खेळवला जाणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमवर (Rajiv Gandhi International Stadium Hyderabad) दोन्ही संघ आमने सामने येतील. सीरिजमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया एक-एक अशा बरोबरीत आहेत. त्यामुळे तिसरा सामना जिंकत ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत.
पहिल्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने 4 विकेटने विजय मिळवला होता. पण दुसऱ्या टी20 सामन्यात भारताने दमदार कमबॅक केलं. पावसाच्या व्यत्ययामुळे प्रत्येकी 8 षटकांच्या खेळवल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाने (Team India) ऑस्ट्रेलियावर (Australia) 6 विकेटने विजय मिळवला. अक्षर पटेलने (Akshar Patel) 2 विकेट घेत गोलंदाजीत कमाल केली. तर रोहित शर्माने (Rohit Sharma) 46 धावांची तुफानी खेळी करत विजयावर शिक्कामोर्तब केलं.
तिसऱ्या सामन्यासाठी संघात बदल?
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात सर्वांच लक्ष असेल ते भारताच्या अंतिम अकरा खेळाडूंवर. दुसऱ्या सामन्यात पावसामुळे ऐनवेळी संघात बदल करण्यात आला होता. भुवनेश्वर कुमारच्या (Bhuvneshwar Kumar) जागी ऋषभ पंतला (Rishabh Pant) संधी देण्यात आली होती. पण आता तिसऱ्या सामन्यासाठी भुवनेश्वर कुमारची पुन्हा एन्ट्री होऊ शकते, त्यामुळे ऋषभ पंतला बाहेर बसावं लागू शकतं.
फलंदाजांवर असेल जोर
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअम फलंदाजीसाटी अनुकूल मानलं जातं. सामन्याच्या सुरुवातीला गोलंदाजांना फायदा मिळू शकतो. पण नंतर फलंदाजांना खेळपट्टीची साथ मिळू शकते. त्यामुळे टॉसही महत्त्वाचा ठरणार आहे. टॉस जिंकणारा संघाचा पहिली गोलंदाजी घेण्याचा प्रयत्न असेल.
झम्पा ठरु शकतो धोकादायक
भारतासाटी हर्षल पटेल (Harshal Patel) आणि यजुवेंद्र चहलचा (Yuzvendra Chahal) फॉर्म चिंतेचा विषय बनलाय. टी20 वर्ल्ड कपपूर्वी या दोघांच्या कामगिरीत सुधारणा होण्याची गरज आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात हर्षल पटेल आणि यजुवेंद्र चहलच्या कामगिरीवरही संघाचं लक्ष असेल. फलंदाजीत के एल राहुल (KL Rahul) आणि विराट कोहलीला (Virat Kohli) आपल्या कामगिरीत सातत्या राखावं लागणार आहे. सुर्यकुमार यादवही (Suryakumar Yadav) गेल्या सामन्यात अपेक्षित कामगिरी करु शकला नव्हता. पण भारतीय संघाला धोका असेल तो ऑस्ट्रेलियाचा स्पिन गोलंदाज अॅडम झम्पाकडून. झम्पा सध्या चांगलाच फॉर्मात आहे.
भारताची संभाव्य Playing 11
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल
ऑस्ट्रेलियाची संभाव्य Playing 11
अॅरोन फिंच (कर्णधार), कॅमरन ग्रीन, स्टीवन स्मिथ, ग्लेन मैक्सवेल, टिम डेविड, मैथ्यू वेड (विकेटकीपर), जोश इंगलिस, सीन एबॉट, पॅट कमिंस, अॅडम झम्पा, जोश हेजलवुड