India vs Australia, 3rd Test Day 1: विराटला कांगारुंनी रोखलं खरं, पण...
तिसरा कसोटी सामना हा दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत या दोन्ही देशांच्या क्रिकेट संघांमध्ये खेळवल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्याला बुधवारी मेलबर्नमध्ये सुरुवात झाली. १-१ अशा बरोबरीत असणाऱ्या या मालिकेतील तिसरा कसोटी सामना हा दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
पहिल्य़ा दिवसाच्या सुरुवातीलाच भारतीय खेळाडूंनी संयमी सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. आपल्या कारकिर्दीतील पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या मयंक अग्रवाचा मैदानावरील वावर आणि त्याची
खेळी क्रीडारसिकांची मनं जिंकून गेली. ज्यासोबत चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीनेसुद्धा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा मारा परतवून लावला. पहिल्या दिवसअखेर भारत २ बाद, २१५ इतक्या धावसंख्येवर असून, दुसऱ्या दिवशी धावांचा हा डोंगर आणखी किती मोठा होणार याचीच क्रीडारसिकांना उत्सुकता लागली आहे.
*विराट (४७) आणि पुजारा (६८) हीच जोडी दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु करणार.
*पहिल्या दिवशी विराट कोहलीला अर्धशतक करण्यारपासून कांगारुंनी रोखलं. पण, तरीही त्याने शेवटच्या चेंडूपर्यंत कागारुंना चिवट झुंज दिल्याचं पाहायला मिळालं.
*पहिल्या दिवसाचा खेळ संपला असून, दिवसअखेर भारताची धावसंख्या २ बाद २१५ इतकी आहे.
*विराटच्या अर्धशतकाकडे क्रीडारसिकांच्या नजरा.
*पुजारा आणि कोहलीची ७४ धावांची भागीदारी
*चेतेश्वर पुजाराचं अर्धशतक. भारताची धावसंख्या १८४ धावांवर २ गडी बाद
* भारताची धावसंख्या २ गडी बाद, १६४ धावा
*विराटकडून सुरेख खेळाचं प्रदर्शन. कांगारुंचा मारा तितक्याच प्रभावीपणे परतवून लावत आहे विराट.
*पॅट कमिन्सच्या गोलंदाजीचा भेदक मारा सुरुच.
*विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराने सावरला भारताचा डाव.
*चहापानानंतर खेळाला पुन्हा सुरुवात. भारताची धावसंख्या २ बाद, १२५ धावा
*७६ धावांची संयमी खेळी खेळणारा मयंक अग्रवाल तंबूत परत. पॅट कमिन्स चेंडूवर झेलबाद
*भारताची धावसंख्या १ गडी बाद, १२३ धावा
*मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा यांच्याकडून संयी खेळाचं प्रदर्शन. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा भेदक मारा सुरुच.
*भारतीय संघाने ओलांडला धावांचा शतकी आकडा
*भारताची धावसंख्या १ गडी बाद, ९९ धावा
*मयंक अग्रवालची अर्धशतकी खेळी. पदार्पणाच्याच सामन्यात मयंकची उल्लेखनीय कामगिरी
*विरामानंतर खेळाला सुरुवात