३१ किमी प्रति तास या वेगाने धावला धोनी, बनवला हा रेकॉर्ड
टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंग दोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या नावावर आता आणखीन एक रेकॉर्ड केला आहे.
नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंग दोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या नावावर आता आणखीन एक रेकॉर्ड केला आहे.
(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)
धोनीचं फिटनेसही खूपच चांगलं आहे आणि याचं उदाहरण प्रत्यक्ष मैदानात पहायला मिळतं. महेंद्रसिंग धोनी आजही क्रिकेटच्या मैदानात असा स्पीड पकडतो जसा एक २० वर्षांचा तरुण क्रिकेटरच.
महेंद्रसिंग धोनीने आपल्या जबरदस्त फिटनेसमुळेच एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान खेळण्यात आलेल्या दुसऱ्या टी-२० क्रिकेट मॅचमध्ये महेंद्रसिंग धोनीने दुसरा रन घेण्यासाठी इतक्या जोराने धाव घेतली की त्याच्या नावावर सर्वात वेगाने धावण्याचा रेकॉर्ड नोंद झाला आहे.
३१ किमी प्रति तास वेगाने धावला धोनी
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी-२० क्रिकेट मॅचमध्ये महेंद्रसिंग धोनीने दुसरा रन घेण्यासाठी ३१ किमी प्रति तास या वेगाने रन काढला.
स्टार स्पोर्ट्सने पोस्ट केलेल्या या व्हिडिओत धोनी ३१ किमी प्रति तास या वेगाने धावत असल्याचं दिसत आहे. मात्र, या मॅचमध्ये धोनीला केवळ १३ रन्सच करता आले.