Hardik Pandya Misbehaved with Virat: ऑस्ट्रेलियाविरोधात तीन दिवसांच्या एकदिवसीय मालिकेला (Ind vs Aus ODI) सुरुवात झाली असून, भारताने पहिला सामना जिंकत विजयी सुरुवात केली आहे. भारताने पहिला सामना पाच गडी राखत जिंकला आहे. पहिल्या सामन्याचं नेतृत्व भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) सोपवण्यात आलं होतं. रोहित शर्मा (Rohit Sharma) अनुपस्थित असल्याने हार्दिक पांड्याकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. दरम्यान, पहिल्या सामन्यात मैदानावर असं काही झालं की विराट कोहलीचे चाहते नाराज झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल (Viral Video) झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि ऑस्ट्रेलियामधील पहिला सामना शुक्रवारी 17 मार्चला मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर खेळवण्यात आला. भारताने या सामन्यात टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजने जबरदस्त गोलंदाजी करताना प्रत्येक तीन गडी बाद केली. ऑस्ट्रेलिया संघ फक्त 188 धावसंख्या करु शकला आणि लाजिरवाणा रेकॉर्ड आपल्या नावे करुन घेतला. 


इतकी कमी धावसंख्या असतानाही भारताची फलंदाजी मात्र ढेपाळलेली दिसली. 83 धावांवर भारताचा अर्धा संघ बाद झाला होता. यानंतर के एल राहुल आणि रवींद्र जडेजाने डाव सांभाळला आणि भारताला सामना जिंकून दिला. 


हार्दिकची विराटशी गैरवर्तवणूक


20 वी ओव्हर सुरु असताना हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव काहीतरी चर्चा करत होता. यावेळी भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली तिथे पोहोचला आणि काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला. पण हार्दिक पांड्याने त्याचं म्हणणं पूर्ण ऐकून घेतलं नाही आणि तेथून निघून गेला. यामुळे विराट कोहली संतापल्याचं दिसून आलं. व्हिडीओवरुन अंदाज लावला, तर विराट कोहली त्याला तुला हवं ते कर असं सांगत असल्याचं दिसत आहे. दुसरीकडे हार्दिक पांड्या मात्र मागे वळून न पाहता तसाच पुढे निघून गेला. 



नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरोधातील टी-20 मालिकेत संजू सॅमसन आणि उमरान मलिक यांना एकाही सामन्यात खेळण्याची संधी देण्यात आली नव्हती. त्या मालिकेत हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं होतं. प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना, हार्दिक पांड्याने आपल्याला इतर कोण काय बोलतं याच्यामुळे फरक पडत नसल्याचं म्हटलं होतं. हा माझा आणि प्रशिक्षकांचा संघ असल्याने योग्य वाटेल त्यालाच खेळवणार असं त्याने सांगितलं होतं.