कोलकाता : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरीवन-डे आज कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर रंगणार आहे. या सामन्यावर पावसाचं सावट आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघ विजयी वाटचाल कायम राखण्यासाठी सज्ज आहेत तर कांगारुंसमोर मालिकेत कमबॅक करण्याचं आव्हान आहे. 


चेन्नईमधील पहिल्या सामन्यात पावसाचा व्यत्यय राहिला असला तरी या सामन्यात भारताने २६ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या १-० अशा आघाडीवर आहे. चेन्नईतील विजयाची पुनरावृत्ती करत ही आघाडी वाढवण्याचा प्रयत्न भारतीय संघ करणार आहे. 


पहिल्या सामन्यात भारताच्या आघाडीच्या फळीने सपशेल निराशा केली होती. मात्र मधल्या आणि खालच्या फळीतील फलंदाजांनी चांगली कामगिरी करत भारताला विजय मिळवून दिला. दुसरीकडे गोलंदाजीतही भारताची कामगिरी चांगली झाली होती. 


सामन्याची वेळ : दुपारी दीड वाजता.