Virender Sehwag On Suryakumar Yadav Post Match Act: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान वर्ल्डकपआधी खेळवल्या जात असलेल्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्यामध्ये भारताचा मधल्या फळीतील स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवला लय गवसल्याने भारतीय चाहते सुखावले आहेत. सूर्यकुमारने मोहालीमधील एकदिवसीय सामन्यात 49 चेंडूंमध्ये 50 धावा केल्याने त्याचा आत्मविश्वास वाढला आहे. या सामन्यापूर्वीच्या अनेक सामन्यांमध्ये सूर्यकुमारला एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडण्यात अपयश येत होतं. पण ऐन वर्ल्डकपच्या आधी त्याला एकदिवसीय सामन्यात लय गवसल्याने चाहते समाधान व्यक्त करत आहेत. भारताने हा सामना जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवने केलेल्या एका कृत्यावर भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने प्रतिक्रिया नोंदवली आहे. 


सूर्यकुमारने नेमकं केलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताने हा सामना जिंकल्यानंतरही शुक्रवारी रात्री अगदी शनिवारचा दिवस सुरु झाल्यानंतरही म्हणजेच मध्यरात्रीनंतरही उशीरापर्यंत सूर्यकुमार मोहालीच्या मैदानावर नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करत असल्याच्या बातम्या समोर आलं. मात्र सूर्यकुमार मध्यरात्रीनंतर सराव करत असतानाच अशाप्रकारे रात्री उशीरा नेट्समध्ये सराव करण्यामागे फंलदाजीची विचारसणी काय असते याबद्दल विरेंद्र सेहवागला टीव्हीवरील चर्चेदरम्यान प्रश्न विचारण्यात आला. त्यावर विरेंद्र सेहवागने मी स्वत: कधी असं काहीही केलेलं नाही, अशी माहिती दिली. सामन्यानंतर विरेंद्र सेहवागला सूर्यकुमारसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्याने, मी तर मैदानात उतरल्यानंतर सर्व ते प्रयत्न कऱण्यास प्राधान्य द्यायचो, असं स्पष्टपणे सांगितलं. सामन्यातील मानसिक बाजू पाहिल्यास सूर्यकुमारला त्याच्या शैलीवर काम करण्याची गरज आपल्याला वाटत नाही असंही सेहवाग म्हणाला.


नक्की वाचा >> बापरे! वर्ल्डकपआधीच गंभीरने हे काय पोस्ट केलं; विराटचे चाहते संतापून म्हणाले, 'हा घाणेरडा माणूस'


सेहवाग काय म्हणाला?


"मला याची गरज वाटत नाही. तुम्ही जेव्हा मैदानात उतरता तेव्हा तिथेच 100 टक्के योगदान दिलं पाहिजे. कधीतरी तुम्ही लवकर बाद होता आणि असं झालं तरी हरकत नाही. माझ्याबाबतीत तर हे असं होतं. मी पुढच्या दिवसापर्यंत कधीच पुन्हा सरावासाठी जायचो नाही. सामन्यानंतर तो (सूर्यकुमार) का सराव करत होता मला ठाऊक नाही. मात्र मला वाटतं की खेळाडू म्हणून तुम्ही प्रत्येक सामन्यासाठी तयारी करायला हवी. तुमच्याकडे संधी होती, तुम्ही चूक केली आणि बाद झालात. त्यामुळे तुम्ही चुकांवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. तुमची विचारसणी महत्त्वाची आहे. तुमचं कौशल्य तुमच्यापासून दूर जात नाही. कौशल्यासाठी तुम्हाला सरावाची गरज नाही," असं विरेंद्र सेहवाग म्हणाला.


सलग 3 वेळा शून्यावर बाद होता तेव्हा...


"हे सर्वकाही तुमच्या विचारसरणीसंदर्भात असतं. तुम्ही एखादा ठराविक फटका मारताना केलेला विचार बरोबर आहे की चुकीचा हे महत्त्वाचं असतं. मानसिक स्तरावर तुमचं ट्यूनिंग जमतंय का हे महत्त्वाचं असतं. जेव्हा तुम्ही सलग 3 वेळा शून्यावर बाद होता तेव्हा तुम्ही तुमच्या कौशल्यावर लक्ष्य केंद्रित करण्याची गरज नसते. आता तुम्ही धावा केल्या आहेत तर तुम्ही मानसिक स्तरावर ट्यूनिंग करणं गरजेचं असतं," असंही विरेंद्र सेहवाग म्हणाला. 


नक्की पाहा Video >> अंपायरच्या अंगात John Cena शिरला अन्...; बॉलर विकेटसाठी अपील करताच काय झालं पाहा Video


सूर्याने विश्वास सार्थ ठरवला


सूर्यकुमार यादवला वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आल्यानंतर अनेकांनी त्याच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्याला एकदिवसीय सामन्यांमध्ये अनेकदा अपयश येत असताना त्याची निवड का केली जाते असं अनेकांनी विचारलं होतं. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात सूर्याने त्याच्यावरील विश्वास सार्थ ठरवला आहे.