नवी दिल्ली : रांची येथे झालेल्या टी २० सामन्यात ऑस्ट्रेलियाची फलंदाज पूर्णपणे ढेपाळली आणि भारताचा धमाकेदार विजय झाला. ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज इंडियन्स बॉलर्सच्या भेदक माऱ्यापुढे तग धरू शकले नाहीत आणि पटापट तंबूत परतले. टीम इंडियाच्या विजयात बॉलर्सनी सर्वात मोठा वाटा उचलला तर फिल्डर्सनेही कोणतीच संधी सोडली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कांगारू एकावेळी चांगल्या मजबूत स्थितीत होते. त्यांनी ७३ रन्स आणि ३ विकेट्स गेले होते पण त्यानंतर ११४ धावा आणि ८ विकेट्स अशी अवस्था झाली होती. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने १८.४ षटकात ११८ धावा केल्या होत्या.डेन ख्रिस्टियनच्या शेवटच्या विकेटनंतर ऑस्ट्रेलियाचा खेळ संपला. कोहलीने त्याला रनआऊट केले.  १८ व्या ओव्हरमधील पहिलाच बॉल भुवनेश्वर कुमारने ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला हा बॉल डेनने लाँग ऑनवर खेळला. एक धाव घेऊन दुसऱ्यांदा चोरटी धाव घेण्याचा त्याने प्रयत्न केला. पण लॉंग ऑनवर उभा असलेल्या कोहलीच्या हातात बॉल होता. कोहलीने 'बुलेटच्या स्पीड'ने स्टम्पच्या दिशेने फेकलेला बॉलने बेल्स उडविल्या.


त्यानंतर धोनीने लगेच अपील केली आणि अम्पायरने निर्णय थर्ड अम्पायरकडे सोपाविला. थर्ड अम्पायरने डेन ला आऊट घोषीत केले.


असा झाला विजय


एकदिवसिय सामन्याची मालिका भारताने ४-१ अशी सहज खिशात टाकल्यानंतर टी २० मालिका जिंकण्याचाही भारताचा प्रयत्न आहे. पावसाच्या व्यत्ययानंतरही पहिल्या टी -२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला ९ गडी राखून हरवले. डक वर्थ लुईस नियमानुसार हा सामना झाला ज्यात भारताने ऑस्ट्रेलियावर सहज मात केली.ऑस्ट्रेलियाने प्रथम बॅटिंग करत १८.४ षटकात आठ विकेटच्या बदल्यात ११८ धावा केल्या. त्यानंतर सामना पावसामुळे थांबला होता. जेव्हा सामन्याचा पुन्हा प्रारंभ झाला तेव्हा भारताने ६ षटकात विजयी लक्ष्य गाठून ४८ धावा केल्या. भारताने ५.३ षटकांत सामना जिंकला. कोहलीने २२ धावा केल्या. शिखर धवन (१५) आणि रोहित शर्मा (११) धावा करत भारताला विजयी केले.