भारताला जिंकण्यास 4 विकेट्स तर ऑस्ट्रेलियाला 137 रन्स गरज
गेल्या 71 वर्षात भारताचा संघ ऑस्ट्रेलियात पहिली टेस्ट मॅच जिंकला नाही.
एडिलेट : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या टेस्टमध्ये पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर 323 रन्सच लक्ष्य ठेवलय. याच उत्तर देताना चौथ्या दिवशी (रविवारी) ऑस्ट्रेलियन संघान 4 विकेटच्या बदल्यात 194 रन्स बनवले. ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी 57.1 ओव्हरमध्ये 137 रन्सची गरज आहे. भारताला जिंकण्यासाठी अजूनही 4 विकेट्सची गरज आहे. गेल्या 71 वर्षात भारताचा संघ ऑस्ट्रेलियात पहिली टेस्ट मॅच जिंकला नाही. हा इतिहास बदलण्याची संधी आज भारताला आहे.
पहिल्या सेशनची धावसंख्या
लंच ब्रेक पर्यंत ऑस्ट्रेलियाने पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात 82 रन्स बनविेले तर 2 विकेट गमावले. आता ते केवळ 137 रन्स दूर आहेत. भारताला अजून 4 विकेट्सची गरज आहे.
नवा बॉल
भारताने 80 ओव्हरचा खेळ झाल्यावर नवा बॉल घेतला. ईशांत शर्माने नव्या ओव्हरचा पहिली ओव्हर टाकली.
भारत जिंकणार ?
पहीली टेस्ट जिंकल्यावर भारत आपला 71 वर्षांचा रेकॉर्ड तोडणार आहे. कॅप्टन विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या फॉर्मात आहे तर यावेळच्या कांगारूंच्या टीममध्ये नेहमीप्रमाणे चमक दिसत नाहीय. बॅटींग अथवा बॉलिंग कुठेच ती चुणूक दिसत नाहीय ज्यासाठी ऑस्ट्रेलियाची टीम ओळखली जाते.
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा 235 चा स्कोर आणि 3 दिवसांची बॉलिंग यातून हे स्पष्ट होतंय. टीममध्ये आत्मविश्वाची कमतरता जाणवताना दिसतेय.