मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारत भक्कम स्थितीमध्ये पोहोचला आहे. चेतेश्वर पुजाराचं शतक आणि त्याला इतर बॅट्समननी दिलेली साथ यामुळे भारतानं दुसऱ्या दिवशी पहिली इनिंग ४४३ रनवर घोषित केली. पुजारानं २८० बॉलमध्ये त्याचं शतक पूर्ण केलं. ३१९ बॉलमध्ये १०६ रनची खेळी करुन पुजारा आऊट झाला. चेतेश्वर पुजाराचं टेस्ट क्रिकेटमधलं हे १७वं शतक होतं. पुजाराबरोबरच मयंक अग्रवालनं ७६ रन, कर्णधार विराट कोहलीनं ८२ रन, रोहित शर्मानं नाबाद ६३ रन, अजिंक्य रहाणेनं ३४ रन आणि ऋषभ पंतनं ३९ रनची खेळी केली. यामुळे भारताला ४४३ रनचा टप्पा गाठता आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीला या इनिंगमध्ये ८२ रन करता आले. याचबरोबर विराटचे या वर्षामध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये ११३८ रन झाले आहेत. एका वर्षात परदेशामध्ये सर्वाधिक रन करणारा कर्णधार बनण्यासाठी विराटला आणखी ७५ रनची गरज आहे. सध्या हे रेकॉर्ड दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅम स्मिथच्या नावावर आहे. स्मिथनं एका वर्षात टेस्ट क्रिकेटमध्ये १,२१२ रन केले होते.


विराटनं द्रविडचं रेकॉर्ड मोडलं


विराटला या मॅचमध्ये शतक करता आलं नसलं, तरी त्यानं राहुल द्रविडचं १६ वर्ष जुनं रेकॉर्ड मोडलं आहे. विराट कोहली एका वर्षात परदेशात सर्वाधिक टेस्ट रन करणारा भारतीय खेळाडू बनला आहे. याआधी हे रेकॉर्ड राहुल द्रविडच्या नावावर होतं. द्रविडनं २००२ साली १,१३७ रन केले होते.


वर्षाच्या सुरुवातीच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील ३ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये विराटनं सर्वाधिक २८६ रन केले होते. त्यानंतरच्या इंग्लंड दौऱ्यातल्या ५ टेस्टमध्ये विराटनं रेकॉर्ड ५९३ रनचा डोंगर उभारला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये विराटला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तो ३ रन आणि ३४ रन करून आऊट झाला. तर दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये विराटनं शतक झळकावलं. विराटनं पहिल्या इनिंगमध्ये १२३ रनची तर दुसऱ्या इनिंगमध्ये १७ रनची खेळी केली.