रांची : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने टीम इंडियाच्या धमाकेदार विजयानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने विजयाचे श्रेय टीम मॅनेजमेंटच्या निर्णयाला दिले. निवड समितीने खेळाडूंची निवड करण्याचा निर्णय योग्य ठरल्याचे त्याने सांगितले. श्रीलंकाविरुद्धच्या मालिकेपासूनच गोलंदाज स्पिनर कुलदीप यादव आणि युवेंद्र चहाल यांना टीममध्ये स्थान असणे हे भारतासाठी फायदेशीर ठरल्याचे त्याने सांगितले.


इथे खेळाडूंचे वैयक्तिक प्रयत्नही आहेत तसेच सांघिक कामगिरीही महत्त्वाची ठरली आहे. अष्टपैलू खेळाडूंची तसेच रहस्यमय गोलंदाजाची (कुलदीप) निवड करुन त्यांना आत्मविश्वास निर्माण करणे या फॉर्मेटनुसार ठरले. एका मॅचमध्ये ते धावा देतीलही पण गेम पलटविण्याची धमकही त्यांच्यात आहे असे सांगत कोहीने भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराचीही प्रशंसा केली. पत्नीच्या आजारानंतर मैदानावर उतरलेल्य शिखर धवनसाठी त्याने आनंद व्यक्त केला.
एकदिवसिय सामन्याची मालिका भारताने ४-१ अशी सहज खिशात टाकल्यानंतर टी २० मालिका जिंकण्याचाही भारताचा प्रयत्न आहे. पावसाच्या व्यत्ययानंतरही पहिल्या टी -२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला ९ गडी राखून हरवले. डक वर्थ लुईस नियमानुसार हा सामना झाला ज्यात भारताने ऑस्ट्रेलियावर सहज मात केली.
ऑस्ट्रेलियाने प्रथम बॅटिंग करत १८.४ षटकात आठ विकेटच्या बदल्यात ११८ धावा केल्या. त्यानंतर सामना पावसामुळे थांबला होता. जेव्हा सामन्याचा पुन्हा प्रारंभ झाला तेव्हा भारताने ६ षटकात विजयी लक्ष्य गाठून ४८ धावा केल्या. भारताने ५.३ षटकांत सामना जिंकला. कोहलीने २२ धावा केल्या. शिखर धवन (१५) आणि रोहित शर्मा (११) धावा करत भारताला विजयी केले.