Women's Asia Cup IND W vs BAN : महिला आशिया कपमधील भारत बांगलादेशमध्ये झालेल्या सामन्यामध्ये भारतीय महिलांनी 59 धावांनी विजय मिळवला आहे. पाकिस्तानविरूद्ध झालेल्या पराभवानंतर महिला संघाने बांगलादेशचा पराभव करत जोरदार पुनरागमन केलं आहे. या विजयासोबत महिला भारतीय संघाने पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर झेप घेत आपलं स्थान आणखी बळकट केलं आहे. (india vs banglades india win asia cup 2022 t20 sport marathi News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघान टॉस जिंकल्यावर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीला आलेल्या शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांनी बांगलादेशच्या संघाची गोलंदाजी फोडून काढली. भारताची पहिली विकेट 96 धावांवर गेली, कर्णधार स्मृती मंधाना 47 धावांवर धावबाद झाली त्यानंतर शेफाली वर्मा 55 धावांवर बाद झाली. त्यानंतर जेमिमाह रॉड्रिक्सने आक्रमक फटकेबाजी करत 35 धावा केल्या. भारतान निर्धारित 20 षटकात 159 धावा केल्या.


बांगलादेशची सुरूवात चांगली केली होती. फर्गना आणि मुर्शिदा यांनी विकेट टिकवून ठेवली होती, स्नेहरानाने पहिला धक्का दिला. त्यानंतर कर्णधार निगर सुलतानाने एक बाजू लावून धरली होती मात्र इतर फलंदाज अपयशी ठरल्याने 159 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 7 विकेट्ससह 100 धावांवर आटोपला.  शेफाली वर्मान आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी तर रेणूक सिंह, स्नेहराणा यांनी 1 बळी घेतले.


दरम्यान, पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यामध्ये भारतीय संघाचा पराभव झाला होता. मात्र आजच्या सामन्यामध्ये  भारतीय संघाने जोरदार मुसंडी मारली आहे. 5 सामन्यांमध्ये 4 विजयांसह पहिल्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा संघ 4 सामन्यांमध्ये 3 विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे.