IND vs BAN Rohit Sharma Ruled Out : टीम इंडिया (team india) आणि बांग्लादेशमध्ये (Ind vs Ban) सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा एक खेळाडू पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. तर दुसरीकडे भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना 22 डिसेंबरपासून मीरपूर येथे खेळला जाणार आहे. मात्र सामन्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma Injury Update) अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे सऱ्या कसोटी सामन्यातूनही बाहेर पडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांगलादेशच्या (IND VS BAN) डावातील दुसऱ्याच षटकात स्लीपमध्ये कॅच घेण्याच्या प्रयत्नात रोहित शर्माच्या बोटाला दुखापत झाली. त्यावेळी रोहित शर्माला तातडीने मैदान सोडाव लागल. या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा दिसणार नाही. रोहित संघात सामील होईल अशी अपेक्षा होती पण आता तो दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसल्याची बातमी समोर येत आहे. भारताच्या आगामी मालिकेतील महत्त्वाचे सामने पाहता बीसीसीआय आणि निवड समितीला कोणताही धोका पत्करायचा नाही.  


वाचा :  फक्त चॅम्पियनाच नाहीतर, या संघांनाही लागली लॉटरी, जाणून घ्या कोणाला किती पैसे मिळाले 


तसेच रोहित शर्मा फलंदाजी करण्यास पूर्णपणे सक्षम आहे परंतु क्षेत्ररक्षणाबाबत थोडा चिंतेत आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मा आता जानेवारीत श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे आणि टी-20 मालिकेत टीम इंडियात पुनरागमन करताना दिसणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील आगामी मालिका 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे.


भारत आणि बांगलादेश यांच्यातील 2 कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना चितगाव येथे खेळल्या गेला. या सामन्यात टीम इंडियाने यजमान बांगलादेशचा 188 धावांनी पराभव केला. तसेच रोहितने 27 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले, पण शेवटच्या चेंडूवरील फटका हुकला अन् 5 धावांनी बांगलादेशने हा सामना जिंकला. दरम्यान, या मालिकेत त्याच्या खेळण्याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे.