भारताचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय
चॅपियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीमध्ये भारताने बांगलादेश विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ पाकिस्तानशी अंतिम लढतीत 18 जूनला फायनल खेळणार आहे.
लंडन : चॅपियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीमध्ये भारताने बांगलादेश विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ पाकिस्तानशी अंतिम लढतीत 18 जूनला फायनल खेळणार आहे.
पहिल्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडला 8 गडी राखून हरवले होते. पण पावसामुळे दुसरा उपांत्य सामना रद्द झाला तर टीम इंडिया फायनलमध्ये प्रवेश करेल.
भारतीय संघ : शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, युवराज सिंह, महेंद्र सिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, आर.अश्विन, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा
बांग्लादेश संघ : तमीम इकबाल, सौम्य सरकार, शब्बीर रहमान, मुशफिखुर रहमान, शाकिब अल हसन, महमुदुल्ला, मोसडेक हुसैन, मुर्तजा, रुबैल हुसैन, तस्कीन अहमद, रहमान