IND vs BAN : डे-नाइट टेस्टच्या Pink Ball चं वेगळेपण
अजिंक्य रहाणेच्या स्वप्नातही Pink Ball
मुंबई : कोलकाता (Kolkata)मध्ये होणाऱ्या भारत विरूद्ध बांग्लादेश (India vs Bangladesh) दुसऱ्या कसोटी सामन्या(Test Match) बाबत प्रेक्षक, चाहते अधिक उत्सुक आहेत. दोन्ही संघ पहिल्यांदांच डे-नाइट (Day-Night)कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यात 'गुलाबी चेंडू' (Pink Ball) चा वापर केला जाणार आहे.
या पिंक बॉलचा दोन्ही संघाला काहीही अनुभव नाही. त्यामुळे प्रेक्षकांसोबतच खेळाडूंमध्ये देखील या सामन्याची आणि चेंडूची उत्सुकता पाहायला मिळत आहे. या सामन्यात एसजी पिंक बॉलचा (SG Pink Ball)उपयोग केला जाणार आहे. पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात (International Test Match) मध्ये याचा वापर केला जाणार आहे.
लाल रंगाऐवजी गुलाबी रंगाचा चेंडू का?
क्रिकेट चाहत्यांसमोर लाल चेंडूऐवजी गुलाबी रंगाचा चेंडू का? याचं कुतूहल आहे. या अगोदर सामन्यात पारंपरिक चालत आलेल्या लाल रंगाच्या चेंडूचा वापर केला जात असे. पण लाल रंगाच्या चेंडूने रात्री सफेद प्रकाशात खेळण्यास अडचण येत असे.
Pink Ball चं वेगळेपण
गुलाबी चेंडूदेखील लाल चेंडूप्रमाणे दोन श्रेणीत आहे. फक्त फरक रंगाचा आहे. गुलाबी रंगाच्या चेंडूचा रंग जाऊ नये याकरता खास खबरदारी घेतली जाते. तसेच लाल चेंडूच्या तुलनेत गुलाबी रंगाच्या चेंडूचा स्पिनर्स गोलंदाजांना थोडा त्रास होतो. गुलाबी रंगाची चमक ही खूप काळ राहून फास्ट गोलंदाजाला सर्वाधिक मदत करते.
त्यातुलनेत गुलाबी चेंडूच्या मदतीने रात्री सफेद प्रकाशतही क्रिकेट खेळ अतिशय सहज होणार आहे. गुलाबी चेंडूने डे-नाइट कसोटी सामना खेळणं सोईचं होणार असल्यामुळे सुरूवातीपासून चालत आलेला लाल रंगाचा चेंडू बाजूला ठेवून गुलाबी रंगाच्या (Pink Ball) ने खेळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतात या चेंडूचा होतो वापर
कसोटी सामन्यात आतापर्यंत लाल रंगाच्या चेंडूचा वापर केला जातो. हा चेंडू देखील दोन प्रकारचा असतो एक कूकाबूरा (kookaburra ball)आणि दुसरा एसजी चेंडू (SG Ball). या दोन्ही चेंडूच्या मूलभूत प्रक्रियेतच अंतर आहे. एसजी चेंडूची शिलाई ही हाताने केली जाते तर कूकाबूरा चेंडूची शिलाई ही मशिनने केली जाते. भारतात एसजी चेंडूचा वापर केला जातो. तर कूकाबूरा चेंडूचा वापर ऑस्ट्रेलियात सर्वाधिक केला जातो.