Ind vs Ban 2nd Test: भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN) यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी भारताने बांग्लादेशचा 3 गडी राखून पराभव केला आहे. अखेरच्या सामन्यात बांग्लादेशचा पराभव करत मालिकेत टीम इंडियाने सुपडा साफ केला. त्यामुळे आता आगामी वर्ल्ड टेस्ट चॅपियनशिपच्या (World test championship) फायनलमध्ये जाण्यासाठी टीम इंडियाचा मार्ग मोकळा होताना दिसतोय. भारताकडून रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि श्रेयस अय्यर (shreyas iyer) यांनी तुफानी खेळ दाखवला. त्यामुळे आता या दोघांची चर्चा होताना दिसत आहे. (India vs Bangladesh Ravichandran Ashwin broke 34 year old record Marathi News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक वेळ अशी होती, ज्यावेळी भारताला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागेल असं वाटत होतं, पण संघाचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यर आणि ऑलराऊंडर रविचंद्रन अश्विन यांनी अर्धशतकी भागीदारी करत टीमला पराभवापासून वाचवलं. या विजयात रविचंद्रन अश्विनच्या दमदार षटकाराचाही (R Ashwin) महत्त्वाचा वाटा होता ज्यामुळे भारताचा विजय निश्चित झाला. यावेळी आश्विनने एक रेकॉर्ड (Ravichandran Ashwin Record) देखील आपल्या नावावर केला आहे.


आर अश्विनने 34 वर्षे जुना विक्रमही मोडला (R Ashwin broke 34 year old record) आहे. आश्विन आता 9 व्या क्रमांकवरील सर्वाधिक खेळी करणारा फलंदाज बनला आहे. आश्विनने बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात 42 धावांची आक्रमक खेळी केली आणि भारताचा विजय निश्चित केला.


आणखी वाचा - Ind vs Ban 2nd Test: अखेर भारत विजयी, भारताचा बांगलादेशला क्लीन स्वीप


दरम्यान, 145 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची (Team India) सुरुवात खूपच वाईट झाली होती. केएल राहुल (KL Rahul) आणि शुभमन गिल (Shubman Gill) लगेचच बाद झाले. तर केएल राहुलने 2 आणि शुभमन गिलने 7 धावा केल्या. विराट कोहलीला (Virat Kohli) केवळ एकच धाव करता आली. 45 वर चार गडी बाद अशी परिस्थिती चौथ्या दिवसापर्यंत होती. त्यानंतर पाचव्या दिवशी अक्षर पटेलने 34 करत भारताला सावरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आश्विनने बाकी काम पूर्ण केलं.