मुंबई : भारतीय युवा गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याला पुन्हा एकदा प्रेक्षकांनी लक्ष बनवलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना प्रेक्षकांच्या उद्धटपणाचा शिकार झाला आहे. इंग्लंड विरूद्ध झालेल्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये प्रेक्षकांनी सिराजवर चेंडू फेकला आहे. ऋषभ पंत (Rishabh Pant) ने पहिल्या दिवसाचा सामना झाल्यावर मीडियासोबत बोलताना या गोष्टीचा खुलासा केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिराज बाऊंड्रीवर फिल्डींग करत होता तेव्हा हा प्रकार घडला. या प्रकारामुळे कोहली देखील खूप भडकला होता. त्याने सिराजचा ती गोष्ट बाहेर फेकण्यास सांगितलं. हा प्रकार सतत दुसऱ्या मॅचमध्ये देखील होत आहे. बाऊंड्रीजवळ असलेल्या भारतीय खेळाडूवर निशाणा साधला आहे. लॉर्ड्स टेस्ट दरम्यान प्रेक्षकांनी शॅंपेनचा कॉर्क मैदानात फेकला. यामधील काही कॉर्क तेथे असलेल्या केएल राहुलवर पडले. 



पंतने सिराजसोबत घडलेल्या प्रकाराची माहिती मीडियाला दिली,'मला वाटतं कुणीतरी सिराजवर चेंडू फेकला. म्हणून कोहली नाराज झाला. तुम्हाला जे हवं ते म्हणा पण फील्डर्सवर सामान नका फेकू. माझ्यामते हे क्रिकेटकरता ठीक नाही. पहिल्या दिवसाच्या नाटकादरम्यान, सिराज प्रेक्षकांशी बोलत असल्याचे चित्रही समोर आले. प्रेक्षक सिराजला भारताच्या स्कोअरबद्दल वारंवार चिडवत असल्याचे सांगण्यात आले. येथे भारतीय खेळाडूने त्याला चांगले उत्तर दिले आणि हावभावाने सांगितले की स्कोअर 1-0 आहे म्हणजेच भारत मालिकेत 1-0 पुढे आहे. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताचा डाव 78 धावांवर संपुष्टात आला.'


27 वर्षीय मोहम्मद सिराज सध्याच्या मालिकेतील भारतातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने पहिल्या दोन कसोटीत 11 बळी घेतले. लॉर्ड्स कसोटीत त्याने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली जिथे त्याने आठ विकेट्स घेतल्या. या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मोहम्मद सिराजला प्रेक्षकांकडून गैरवर्तणुकीला सामोरे जावे लागले. सिडनी कसोटी दरम्यान, काही प्रेक्षकांनी त्याच्यावर वर्णद्वेषी टिप्पण्या केल्या आणि त्याला वेगवेगळ्या नावांनी हाक मारली. यामुळे खेळ थांबवावा लागला आणि संतप्त प्रेक्षकांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर सिराज आणि अजिंक्य रहाणे यांनी पंचांकडे याबाबत तक्रार केली. यामुळे बराच वाद झाला.