मुंबई: टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर आहे. चॅम्पियनशिप पराभूत झाल्यानंतर इंग्लंड सीरिज जिंकणं टीम इंडियासाठी गरजेचं आहे. ऋषभ पंतला कोरोनाची लागण झाली आहे. तर दुसरीकडे शुभमन गिल जखमी झाल्याने त्याच्या जागी कोणाला संघात घेता येईल याबाबत चर्चा सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुभमन गिल जखमी असल्याने आता टीम इंडियाकडून ओपनिंगची संधी के एल राहुल आणि मयंक अग्रवालला मिळू शकते अशी चर्चा आहे. BCCI ने शुभमन गिलच्या रिप्लेसमेंटबाबत अधिकृत घोषणा केली नाही. मात्र सध्या दोन नावं समोर येत आहेत. त्यापैकी एक मुंबईकर तर दुसरा आयपीएल गाजवणारा खेळाडू आहे. या दोघांपैकी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वाचं लक्ष आहे. 


मुंबईचा पृथ्वी शॉ आणि बंगळुरू संघाचा ओपनर देवदत्त पडिक्कल या दोघांच्या नावाची चर्चा आहे. मात्र पृथ्वी शॉला ही संधी मिळण्याची जास्त शक्यता आहे. याचं कारण म्हणजे त्यांची विजय हजारे, रणजी ट्रॉफीतील कामगिरी आणि दुसरं म्हणजे ऑस्ट्रेलिया दौरा. शॉची जरी ऑस्ट्रेलियामधील कामगिरी विशेष नसली तरी पुन्हा एकदा त्याला इंग्लंडसाठी संधी दिली जाण्याची शक्यता आहे. 


टीम इंडिया स्क्वाड- विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, आर अश्विन, रवींद जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकुर, उमेश यादव. 
स्टॅण्डबाय खेळाडू: अभिमन्यू ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि अरजान नागवासवाला.