लंडन : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना (India vs England 2nd Test 1st Day) खेळवण्यात येत आहे. हा सामना क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर (Lords Cricket Ground) खेळवण्यात येत आहे. या सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर मुंबईकर रोहित शर्माने (Rohit Sharma) शानदार कामगिरी केली आहे. रोहितने एकूण 145 चेंडूत 11 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने 83 धावांची खेळी केली. रोहितचं शतक अवघ्या 17 धावांनी हुकलं. जर रोहितने शतक ठोकलं असतं, तर तो अशी कामगिरी करणारा 10 वा भारतीय ठरला असता.  रोहितचं लॉर्ड्सवर शतक करण्याचं स्वप्न भंगलं असतं तरी रोहित आणि केएल राहुल (K L Rahul) या सलामी जोडीने विक्रमी कामगिरी केली आहे. (India vs England 2nd Test 1st Day Rohit Sharma and KL Rahul have 50 plus run record opening partnership for India 1st innings at Lords after since 1952) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विक्रमी सलामी भागीदारी 


इंग्लंडने टॉस जिंकून भारताला बॅटिंगसाठी भाग पाडले. केएल राहुल आणि रोहित शर्मा या सलामी जोडीने भारताला चांगली सुरुवात मिळवून दिली. या जोडीने 126 धावांची सलामी भागीदारी केली. यासह दोघांनी विक्रमी भागीदारी केली. भारताकडून लॉर्ड्सवर पहिल्या डावात 1952 नंतर पहिल्यांदा 50 पेक्षा अधिक धावांची भागीदारी करण्यात आली आहे. एका बाजूला  रोहित फटकेबाजी करत होता. तर दुसऱ्या बाजूला केएल राहुलने रोहितला चांगली साथ दिली.  


रोहित आणि राहुलच्या आधी भारताकडून लॉर्ड्सवर 50 पेक्षा अधिक धावांची भागीदारी ही 1952 मध्ये केली गेली होती. ही भागीदारी पंकज रॉय आणि वीनू मांकड या सलामी जोडीने केली होती. तेव्हा या जोडीने 100 धावांची पार्टनरशीप केली होती. रोहित आणि राहुलने अनेक वर्षानंतर पहिल्या विकेटसाठी 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. 


शतकी भागीदारी करणारी दुसरी सलामी जोडी


दरम्यान रोहित आणि राहुल ही दुसरीच जोडी आहे ज्यांनी 1980 नंतर टीम इंडियाकडून सलामी शतकी भागीदारी केली आहे. याआधी 2007 मध्ये वसीम जाफर आणि दिनेश कार्तिकने पहिल्या विकेटसाठी 100 धावा केल्या होत्या. 


लॉर्ड्सवर भारताकडूनचं अखेरचं शतक


दरम्यान रोहित शर्माचं शतक हुकलं असल्याने आता भारताला लॉर्ड्सवर शतकासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. भारताकडून लॉर्ड्सवर अखेरचं शतक हे अजिंक्य रहाणेने लगावलं होतं. अजिंक्यने 17 जुलै 2014 रोजी 154 चेंडूत 15 चौकार आणि 1 सिक्ससह 103 धावांची खेळी केली होती.