चेन्नई : इंग्लड विरुद्ध दुसऱ्या टेस्ट (India vs England, 2nd Test ) सामन्यात भारतीय संघाने चांगलं प्रदर्शन केलं आहे. या सामन्यात भारताचा अनुभवी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) विरूद्ध संघाच्या पहिल्या ओव्हरमध्येच सामना गुंडाळला.  रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना ४३ धावा देऊन ५ विकेट गमावल्या आणि इंग्लंडच्या फलंदाजांची कंबर मोडून ठेवली. अश्विनने एकाचवेळी अनेक रेकॉर्ड्स रचले. 


अश्विनने हरभजन टाकलं मागे 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) ने हरभजन सिंह (Harbhajan Singh) ला मागे टाकलं आहे. भारतीय मैदानावर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.  अश्विनने दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी आपल्या ऑफ स्पिनने बेन स्टोक्स (Ben Strokes) ला आऊट केलं. यानंतर हरभजन सिंहला मागे टाकत स्वतःच्या नावे 28.76 सरासरीत 265 विकेट नोंदवल्या. घरगुती मैदानावर अश्विनने 266 विकेट घेतल्या. 


अश्विनने भज्जीची मागितली माफी 


अश्विनने आपल्या सीनिअर गोलंदाजाचा रेकॉर्ड तोडल्यानंतर हरभजन सिंहची माफी मागितली आहे. 'जेव्हा मी 2001 मध्ये हरभजनला खेळताना पाहिलं तेव्हा मी विचार केला नव्हता की मी ऑफ स्पिनर म्हणून खेळेल.  मी तेव्हा माझ्या राज्यासाठी खेळत होतो. आणि फलंदाजीत मला माझं करिअर करायचं होतं. '



आतापर्यंत 76 टेस्टमध्ये 25.26 सरासरीने एकूण 391 विकेट घेतल्या आहेत. 34 वर्षीय अश्विनने म्हटलं की,'त्या वयाचे माझे सर्व खेळाडू मस्करी करायचे. कारण मी तेव्हा भज्जी पा सारखं गोलंदाजी करायचो. अशा परिस्थितीत आता त्यांचा रेकॉर्ड तोडणं हे माझ्यासाठी खूप खास आहे. '