लंडन : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात चौथ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा (Ind vs ENG 4th Test Day 2) खेळ सुरु आहे. या खेळादरम्यान मूळचा इंग्लंडचा असलेला मात्र टीम इंडियाचा चाहता असलेला जारवो (Jarvo)  पुन्हा मैदानात शिरला. जारवोची मैदानात घुसण्याची ही तिसरी वेळ ठरली. जारवोच्या या घुसखोरीचा व्हीडिओ आता व्हायरल होतोय. (india vs england 4th test day 2 pitch invader jarvo is back third time in ground during match) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नक्की काय झालं? 


इंग्लंडच्या डावातील 34 व्या ओव्हरचा खेळ सुरु होता. उमेश यादव ओव्हर टाकत होता. स्ट्राईकवर जॉनी बेयरस्टो होता. तर नॉन स्ट्राईकएंडवर ओली पोप होता. ओव्हसरमधील 2 बॉल टाकून झाले होते. तेवढ्यात जारव्हो सुरक्षा यंत्रणा भेदत जोरदार रनअप घेत मैदानात शिरला. बॉलिंगची एक्शन केली. त्यानंतर नॉनस्ट्राईकवर असलेल्या ओली पॉपला जाऊन धडकला. अचानक आपल्याला जोरात कोण धडकला, म्हणून ओली पोप घाबरला. 


ऑलराऊंडर जारव्हो


जारव्होची मैदानात अशाप्रकारे घुसण्याची ही मैदानात घुसण्याची तिसरी वेळ आहे. जारव्हो सर्वातआधी लॉर्ड्सवर (Lords Test) झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये पहिल्यांदा टीम इंडियाची 69 नंबरची जर्सी घालून मैदानात आला होता. मी टीम इंडियाचा प्लेअर असल्याचं तो सुरक्षा अधिकाऱ्यांना सांगत होता. त्यावेळेस जारव्हो हा फिल्डर म्हणून मैदानात आला होता. त्यानंतर लीड्स टेस्ट सामन्यादरम्यान असाच घुसला होता. मात्र तेव्हा जारव्हो बॅटिंगसाठी आला होता. परवानगीशिवाय मैदानात घुसल्याने जारव्होवर इंग्लिश काउंटी यॉर्कशायरने Yorkshire)  जारव्होवर आजन्म बंदी टाकली. त्यानंतर आता जारव्हो बॉलिंगसाठी आला होता.


कोण आहे जारव्हो? 


जारव्होला पिच इंव्हेडर (Pitch Invader) म्हणून ओळखलं जातं. मात्र त्याचं खर नाव हे डेनियल जारविस (Daniel Jarvis) असं आहे. जारव्हो नेहमीच 69 नंबरची जर्सी घालतो. त्यामुळे त्याला 'जारवो 69' असंही म्हणतात. दरम्यान आता जारव्हो मैदानात तिसऱ्यांदा घुसलाय. त्यामुळे जारव्होवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचच लक्ष असणार आहे.