मुंबई : टीम इंडिया 5 सामन्यांच्या सीरिजमधील शेवटचा सामना 1 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. इंग्लंड विरुद्ध कसोटी सीरिजमध्ये टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. ही सीरिज जिंकणं टीम इंडियासाठी फार महत्त्वाचं आहे. इंग्लंड विरुद्ध शेवटच्या सामन्याआधी टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांनी विराट कोहलीला इशारा दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीकडून शतक नाही तर राहुल द्रविड यांनी सीरिज जिंकवून देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी कोहलीला इशारा दिला आहे. यावेळी शतक नको पण सीरिज जिंकवण्याची जबाबदारी तुझी असल्याचं म्हटलं आहे. 


राहुल द्रविड काय म्हणाले? 
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणतात की, त्याला विराट कोहलीकडून सामना जिंकण्याची अपेक्षा आहे. शतक नसलं तरी चालेल, पण सीरिज जिंकावी. कोहलीला नोव्हेंबर 2019 पासून शतक झळकावता आलेले नाही.


खेळाडू वेगवेगळ्या टप्प्यांमधून जातात आणि मला वाटत नाही की विराटमध्ये प्रेरणा किंवा उत्कटतेचा अभाव आहे. विराटकडून मला सामना जिंकून द्यावा हीच अपेक्षा आहे. हा सामना जिंकवून देण्यात त्याचं मोठं योगदान असायला हवं, असं द्रविड म्हणाले आहेत. 


रोहित शर्माला कोरोना झाल्यानंतर तो उपचार घेत आहे. अजून तो पूर्णपणे बरा झाला नाही. त्याऐवजी आता टीम इंडियाचं नेतृत्व जसप्रीत बुमराहकडे देण्यात आलं आहे. कसोटी फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा बुमराह 36 वा कर्णधार ठरला आहे. 


आता कर्णधारपद कोणाकडे याची घोषणा झाली मात्र रोहितच्या अनुपस्थितीमध्ये टीम इंडियाकडून ओपनिंगला कोण उतरणार या प्रश्नाचं उत्तर मिळणं अजूनही बाकी आहे. इंग्लंड विरुद्ध 1 जुलैपासून पाचवा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे.