मुंबई : विराट कोहली गेल्या दीड वर्षापासून खराब फॉर्ममध्ये खेळतोय. आयपीएलमध्येही त्याला विशेष कामगिरी करता आली नाही. त्यापाठोपाठ आता इंग्लंड विरुद्धच्या सामन्यातही त्याला फार यश मिळाले नाही. कोहली टी 20 च्या दोन्ही सामन्यात सपशेल फ्लॉप ठरला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाला कोहलीची रिप्लेसमेंट मिळाली आहे. त्यामुळे कोहलीचं करिअर धोक्यात येण्याची शक्यता आहे. तर कोहलीने आता संन्यास घ्यावा अशी मागणी काही दिग्गजांनी केली आहे.  


इंग्लंडविरुद्ध सामन्यात विराटची बॅट धावा काढण्यात अपयशी ठरली. या सीरिजमध्ये दुसऱ्या सामन्यात विराट एक धावा करून बाद झाला, तर शेवटच्या टी-२०मध्ये विराटच्या बॅटला एका चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 11 धावा करता आल्या. 


कर्णधार रोहित आणि कोच द्रविडवर केवळ विराटला या सीरिजमध्ये घेतल्यावरून खूप प्रश्न विचारले होते. तसंच ट्रोलही करण्यात आलं होतं. मात्र निवड समिती विराटला शेवटची संधी देत ​​असल्याचंही रिपोर्ट्समधून समोर आलं आहे. अशा परिस्थितीत त्याला टी-20 टीममधून पुढच्यावेळी वगळंलं जाऊ शकतं. 


आयपीएलपासून दीपक हुड्डा उत्तम कामगिरी करताना दिसत आहे. त्याने इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात तुफान बॅटिंग केली. दीपक हुड्डा चांगल्या फॉर्ममध्ये खेळत असताना त्याला टीम इंडियातून बाहेर करण्यात आलं. 


दीपकने टीम इंडियासाठी आतापर्यंत एकूण 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने 6 टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 68.33 च्या सरासरीने 205 धावा केल्या आहेत. यादरम्यान दीपक हुडाच्या बॅटमधूनही शतक झळकले आहे. अलीकडेच 28 जून रोजी आयर्लंडविरुद्धच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात दीपक हुडाने 104 धावा केल्या होत्या.


टी 20 वर्ल्ड कपसाठी मॅनेजमेंट तगडी टीम निवडण्याच्या तयारीत आहे. यंदा हा वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियामध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यांनी दीपक हुड्डाला तिसऱ्या क्रमांकावर खेळवून आजमावलं आणि तो मॅनेजमेंटच्या विश्वासाला पात्र ठरला. त्यामुळे आता विराट कोहलीचं काय होणार असाही प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला आहे.


दीपक हुड्डाने इंग्लंडविरुद्ध 33 धावांची खेळीही खेळली होती. त्याने 17 बॉलमध्ये 33 धावा केल्या होत्या. टीम इंडियाच्या विजयात त्याचंही मोठं श्रेय आहे. टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध 3 सामन्यांची टी 20 सीरिज 2-1 ने जिंकली आहे.