Ind vs Eng Test Series : भारत आणि इंग्लंडदरम्यान खेळवल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेच्याआधीच टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) या मालिकेतून बाहेर पडला आहे. विराट कोहलीने भारतीय क्रिकेट बोर्डाकडे (BCCI) पहिले कसोटी मालिका न खेळण्याची विनंती केली होती. विराटची ही विनंती बीसीसीआयने मंजूर केली आहे. याबाबत बीसीसीआयने एक निवेदनही जाहीर केलं आहे. विराट कोहली वैयक्तिक कारणामुळे या मालिकेत खेळणार नसल्याचं बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. पण विराट कोहलीच्या बाहेर जाण्यामुळे टीम इंडियात विराटच्या जागी म्हणजे चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार याचा प्रश्न टीम इंडियासमोर उभा राहिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहली चौथ्या क्रमांकावर खेळतो. तो टीम इंडियाचा महत्वाचा खेळाडू आहे. भारत-इंग्लंड पहिला कसोटी सामना हैदराबादमध्ये होणार आहे. या मैदानावर विराट कोहलीचा रेकॉर्डही चांगला आहे. पण आता टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या समोर कोणते पर्याय आहे ते पाहूया.


काय आहेत पर्याय?
विराट कोहीलच्या चौथ्या क्रमांकासाठी सर्वात मोठा दावेदार आहे तो म्हणजे आक्रमक फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer). अय्यर एकदिवसीय संघातून चौथ्या क्रमांकसाठी खेळतो. या नंबरवर त्याची कामगिरीही चांगली आहे. पण कसोटी  क्रिकेटमध्ये अय्यर पाचव्या क्रमांकावर खेळतो. पण आता विराट कोहली नसल्याने त्याला चौथ्या क्रमांकावर बढती मिळण्याची शक्यता आहे. 


अय्यर शिवाय टीम इंडियाकडे चौथ्या क्रमांकावर आणखी एक पर्याय आहे तो म्हणजे विकेटकिपर फलंदाज केएल राहुल (KL Rahul). कसोटी क्रिकेटमध्ये केएल राहुल सलामीला खेळतो. पण केएल राहुल असा फलंदाज आहे जो संघाच्या गरजेनुसार कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास सक्षम आहे. एकदिवसीय संघात केएल राहुल पाचव्या क्रमांकावर खेळतो. त्यामुळे केएल राहुलचाही टीम इंडियासमोर पर्याय आहे.


यशस्वी जयस्वालची कसोटी क्रिकेटमध्ये एन्ट्री झाल्यापासून शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. पण प्रयोग म्हणून शुभमन गिलला टीम इंडिया चौथ्या क्रमांकावर खेळवू शकते. तिसऱ्या क्रमांकावर केएल राहुलला बढती मिळू शकते. 


पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयसवाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार ), आवेश खान.


भारत  Vs इंग्लंड कसोटी वेळापत्रक
पहिला कसोटी सामना : 25-29 जानेवरी, हैदराबाद
दुसरा कसोटी सामना : 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टनम 
तिसरा कसोटी सामना : 15-19 फेब्रुवारी, राजकोट
चौथा कसोटी सामना : 23-27 फेब्रुवारी, रांची 
पाचवा कसोटी सामना : 7-11 मार्च, धर्मशाला