Yashasvi Jaiswal: वडिलांचा `तो` एक सल्ला अन् यशस्वी जयस्वालने ठोकली डबल सेंच्युरी
Yashasvi Jaiswal Double Century: इंग्लंडविरोधातील (India vs England) दुसऱ्या कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) दुहेरी शतक ठोकल्यानंतर त्याच्या घरी दिवाळी साजरी केली जात आहे. यशस्वी उत्तर प्रदेशच्या गृहनगरचा आहे.
Yashasvi Jaiswal Double Century: इंग्लंडविरोधातील (India vs England) दुसऱ्या कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) जबरदस्त खेळी करत दुहेरी शतक ठोकलं. भारतीय संघातील एकही फलंदाज 35 च्या पुढे धाव करु शकला नसताना, एकट्या यशस्वी जयस्वालने 209 धावा ठोकल्या आहेत. जयस्वालच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघ पहिल्या डावात 396 धावा करु शकला. यशस्वीच्या या जबरदस्त खेळीनंतर त्याच्या घऱी घरी दिवाळी साजरी केली जात आहे. यशस्वी उत्तर प्रदेशच्या गृहनगरचा आहे. क्रिकेट चाहते यशस्वीच्या वडिलांच्या दुकानाबाहेर पोहोचले आणि ढोल-ताशा वाजवत आनंद साजरा करु लागले.
यशस्वी भदोही जिल्ह्याच्या सुरियावाचा निवासी आहे. त्याचे वडील भूपेंद्र जयस्वाल यांचं सुरियावा येथे पेंटचं दुकान आहे. यशस्वीचे वडील दुकानात मोबाईलवर हा सामना लाईव्ह पाहत होते. यावेळी यशस्वीने द्विशतक ठोकताच गर्दी त्यांच्या दुकानाबाहेर जमा झाली. यानंतर ढोल वाजवत आणि फटाके फोडत अक्षरश: दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी 'भारत माता की जय'च्या घोषणाही देण्यात आल्या. यावेळी यशस्वीच्या वडिलांनी फक्त त्यांच्यासाठी नाही तर राज्य आणि देशासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया दिली.
'यशस्वीला सांभाळून खेळण्यास सांगितलं होतं'
यशस्वीचे वडील भूपेंद्र जयस्वाल म्हणाले आहेत की, "मी सागितलं की होतं की उत्तम आणि चांगली खेळी कर. आतापर्यंत केली आहेस तशीच मेहनत करत राहा. यशस्वी हो आणि भदोही जिल्ह्याचं नाव मोठं कर. संपूर्ण सुरियावा नगर आनंदी आहे. सामन्याआधी आमच्यात बोलणं झालं होतं. त्यावेळी मी त्याला सांभाळून खेळ सांगितलं होतं".
कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी 200 धावा करणारे सर्वात तरुण खेळाडू
21 वर्षं 35 दिवस, विनोद कांबळी, 224 विरुद्ध इंग्लंड, मुंबई 1993
21 वर्षं 55 दिवस, विनोद कांबली 227 विरुद्ध जिम्बाव्बे, दिल्ली 1993
21 वर्षं 283 दिवस, सुनील गावस्कर, 220 विरुद्ध वेस्टइंडीज, पोर्ट ऑफ स्पेन 1971
22 वर्षं 37 दिवस, यशस्वी जायसवाल 209 विरुद्ध इंग्लैंड, विशाखापट्टणम 2024
कसोटी क्रिकेटमध्ये भारताच्या डाव्या हाताच्या फलंदाजांनी ठोकलेलं द्विशतक
239 सौरव गांगुली विरुद्ध पाकिस्तान, बेंगलुरु 2007
227 विनोद कांबळी विरुद्ध जिम्बाव्बे, दिल्ली 1993
224 विनोद कांबळी विरुद्ध बनाम इंग्लैंड मुंबई, 1993
206 गौतम गंभीर विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दिल्ली 2006
209 यशस्वी जयसवाल विरुद्ध इंग्लैंड, विशाखापट्टणम 2024