वानखेडेवर बॉल बॉयने घेतला कोहलीचा जबरदस्त कॅच
कोहलीने टोलावलेल्या एका सिक्सरचा जबरदस्त कॅच पिच बाहेर एका बॉल बॉयने पकडला.
मुंबई : नूकत्याच झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारताला ६ विकेट्सनी हार पत्करावी लागली. त्यामुळे ३ सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंड १-० ने आघाडी घेतली आहे. भारताने केवळ २८० एवढीच धावसंख्या उभारली.
भारतातर्फे विराट कोहलीने शतकी खेळी करत धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला पण बाकीच्या बॅट्समन्सनी त्याला पाहिजे तशी साथ दिली नाही. दरम्याने कोहलीने टोलावलेल्या एका सिक्सरचा जबरदस्त कॅच पिच बाहेर एका बॉल बॉयने पकडला.
भारताच्या ११५ वर ३ विकेट असताना कार्तिक २७ तर कोहली ४१ वर खेळत होता. यावेळी कोहलीने सिक्सर लगावला. यावेळी पिच बाहेर असलेल्या बॉल बॉयने धावत जाऊन हवेतच कॅच झेलला. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला.
हा प्रसंग पुन्हापुन्हा दाखवल्यानंतर हा 'बॉल बॉय' थोडासा लाजला. पण त्याच्या फिल्डिंगचे स्टेडिअममधील प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून कौतूक केले.