कानपूर: नेहमी शांत आणि संयम म्हणून ओळखला जाणार आर अश्विन न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात खूपच संतापलेला दिसला. त्याचा पारा एवढा चढला की त्याने कॅप्टनलाही जुमानलं नाही. अखेर अश्विनला शांत करण्यासाठी कोच राहुल द्रविडला मैदानात उतरण्याची वेळ आली. अंपायरसोबत आर अश्विन भिडल्याचं मैदानात पाहायला मिळालं. याचा व्हिडीओ पाहून चाहतेही हैराण झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंड विरुद्ध कानपूरमध्ये कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू आहे. या सामन्याचा आजचा तिसरा दिवस आहे. विराट कोहलीला पहिल्या कसोटी सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणे कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी स्पिनर आर. अश्विन जबरदस्त बॉलिंग करताना दिसला. 


या सामन्यात रविचंद्रन अश्विनने तुफान बॉलिंग केली. बॉलिंग दरम्यान अंपायर नितीन मेनन यांच्यासोबत अश्विनचं जोरदार भांडण झालं. त्यावेळी भांडण सोडवण्यासाठी अजिंक्य रहाणेला मध्यस्ची करावी लागली. 


अश्विन नॉन स्ट्रायकरच्या टोकाला उभा असलेला अंपायर आणि फलंदाज यांच्यामध्ये येताना दिसला. अश्विन जेव्हा स्टम्पच्या जवळ बॉल फेकत होता. अंपायरच्या दोन तक्रारी होत्या. अश्विन डेंजर एरियामध्ये येत होता. तर दुसरी समस्या होती की अश्विन समोर येत असल्याने अंपायरला निर्णय देण्यात अडथळा येत होता. 


या दोन मुद्द्यांवरून अंपायर आणि आर अश्विनमध्ये वाद झाला. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. टॉम लॅथमच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू हुकल्याने अश्विन पंच नितीन मेनन यांच्यावर नाराज होता. ज्या षटकात अश्विनचा अंपायरशी वाद झाला.