IND vs NZ: टीम इंडियाची प्रतिष्ठा पणाला...आता न्यूझीलंडविरुद्ध जिंकावच लागेल!
Team India: तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधण्यासाठी टीम इंडियाला उद्या क्राइस्टचर्चमध्ये (christchurch) होणाऱ्या तिसऱ्या वनडेवर पावसाची सावट पडू नये, अशी प्रार्थना करावी लागणार आहे.
India vs New Zealand, 3rd ODI: टी-ट्वेंटीमध्ये गुलाल उधळल्यानंतर आता टीम इंडियाची (Team India) प्रतिष्ठा पणाला लागली आहे. वनडे सिरीजच्या (India vs New Zealand) पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर दुसरा सामना पावसाने धुवून काढला. त्यानंतर भारताला काही केल्या तिसरा सामना (India vs New Zealand, 3rd ODI) जिंकावा लागणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना उद्या भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजता क्राइस्टचर्च येथे खेळवला जाईल. (india vs new zealand 3rd odi match christchurch rain prediction team india shikhar dhawan captain kiwi team)
तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधण्यासाठी टीम इंडियाला उद्या क्राइस्टचर्चमध्ये ( christchurch) होणाऱ्या तिसऱ्या वनडेवर पावसाची सावट पडू नये, अशी प्रार्थना करावी लागणार आहे. उद्या ख्राईस्टचर्चमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय आणि पाऊस पडला (rain prediction) तर टीम इंडियाच्या हातातून मालिका पराभव निश्चित मानला जातोय.
क्राइस्टचर्चचं हेगले ओवल मैदान (Oval Stadium) साधारणरित्या फिरकीपटूंसाठी फायदेशीर ठरू शकतं. त्यामुळे टॉस देखील महत्त्वाचा राहिल. भारतीय सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि शुभमन गिल (Shubhman Gill) चांगली कामगिरी करत आहेत. पण रिषभ पंत (Rishabh Pant) टीम इंडियासाठी डोकेदुखीचा विषय राहिलाय. तर दुसरीकडे संजू सॅमसंग (Sanju Samson) टीम इंडियात संधी मिळण्याची वाट पाहतोय. त्यामुळे आता अखेरच्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये कोणाला घेणार आणि कोणाला डच्चू मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
आणखी वाचा - ICC World Cup 2023: अफगानिस्तानला मिळाली वर्ल्ड कपमध्ये एंट्री; पाकिस्तानचं काय होणार?
दरम्यान, शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) पहिल्या एकदिवसीय सामन्यात काही खास कामगिरी करू शकला नाही, त्यामुळे केवळ अर्शदीप सिंग, दीपक चहर आणि उमरान मलिक (Umran Malik) वेगवान गोलंदाजांवर टीम इंडियाची कमान उभी राहिल. मात्र, फिरकीरपटूंच्या गोलंदाजांची धार पहायला मिळणार की नाही?, यावर अनेकांनी प्रश्नच उभा केले आहेत.