Rohit Sharma on New Zealand: न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा पराभव करत मालिकाही खिशात घातली आहे. यासह भारतावर घरच्या मैदानावर तब्बल 18 मालिका जिंकल्यानंतर पराभवाची नामुष्की ओढवली. न्यूझीलंडने पुण्यातील कसोटी सामना जिंकत मालिकाही 2-1 ने जिंकली. दुसऱ्या सामन्यात भारताचा 113 धावांनी पराभव झाला. या पराभवानंतर रोहित शर्माने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आम्ही दबावात चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरल्याचं मान्य केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डावखुरा फिरकीपटू मिचेल सँटनरने शनिवारी दुसऱ्या डावात 104 धावांमध्ये 6 विकेट मिळवत आपली छाम उमटवली. न्यूझीलंडने यजमानांवर 113 धावांनी विजय मिळवून प्रथमच भारतात ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकून अकल्पनीय कामगिरी केली. पहिल्या डावात 7-53 अशी कामगिरी करणाऱ्या सँटनरने 6-104 अशा उल्लेखनीय स्पेलसह भारताला पुन्हा एकदा रोखलं. 


या सामन्याबद्दल रोहितने सांगितलं की, "आम्ही पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली नाही. खेळपट्टी चांगली नव्हती असं नाही. पण आम्ही त्यांच्या पहिल्या डावातील धावसंख्येच्या जवळही गेलो नाही. पण जसजसा खेळ पुढे गेला तसतसी खेळपट्टी वेगळी वागू लागली. आम्हाला त्या धावा हव्या होत्या. गिल-यशस्वीच्या भागीदारीनंतर आम्ही विकेट गमावले. आम्ही दबावात चांगली खेळी करण्यात अयशस्वी ठरलो". 2012 मध्ये ॲलिस्टर कूकच्या नेतृत्वातील इंग्लंड संघाने 2-1 ने मालिका जिंकल्यानंतर हा भारताचा मायदेशात झालेला पहिला कसोटी मालिका पराभव आहे. 


"मागील दोन सामन्यात सर्व गोष्टी चुकीच्या बाजूने गेल्या आहेत. आम्ही याआधी 18 मालिका जिंकल्या असल्याने अनके गोष्टी योग्य केल्या आहेत. आम्ही भारतातील सर्व आव्हानात्मक खेळपट्टींवर खेळलो आहोत. अशा गोष्टी होत असतात. जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा योग्य दिशने घडणार नाहीत अशाही काही गोष्टी मालिकेत घडतता. मी कोणाच्याही क्षमतेवर शंका घेत नाहीये. मला फार पोस्टमॉर्टम करायचा नाही आहे. फलंदाजांनी त्यांच्या योजनांवर विश्वास ठेवायला हवा. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी जर तुम्ही एका पद्धतीने फलंदाजी केली तर तेही काम करतं हे दाखवून दिलं आहे. ते पुढे असल्याने त्यांचा आत्मविश्वास जास्त होता," असं रोहित शर्मा म्हणाला.


पुढे त्याने सांगितलं की, "वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपचा विचार करणं आता थोडं लवकर होईल. आम्ही सामन गमावला असल्याने मला वाईट वाटत आहे. मला फार पुढचा विचार करायचा नाही. हे एकत्रित अपयश आहे. जर तुम्ही कसोटी सामना गमावला असले तर संपूर्ण संघाने जबाबदारी घ्यायला हवी".


"तुम्ही तीन दिवस फलंदाजी केलीत, तर तुम्ही कसोटी सामना जिंकू शकाल. धावसंख्येपर्यंत मजल गाठण्याचा प्रयत्न होता. जर खेळपट्टी विशिष्ट प्रकारे वागत असेल तर तुम्हाला धावा कराव्या लागतील आणि गोलंदाजांना दबावात ठेवावं लागेल. हा कसोटी सामना जिंकण्याची सधी आमच्याकडे  होती. पण सामना जिंकण्याऐवजी तो ड्रॉ करण्याच्या मनस्थितीत मी अजिबात जा नाही,"  असं रोहित शर्मा म्हणाला.