दुबई: टी 20 वर्ल्ड कपनंतर न्यूझीलंड विरुद्ध टी 20 सीरिज सुरू होणार आहे.  टीम इंडिया भारतीय न्यूझीलंड विरुद्ध 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. 2021 च्या टी 20 वर्ल्ड कपनंतर भारतीय T20 क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे विराट कोहलीने आधीच जाहीर केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) न्यूझीलंडविरुद्धच्या T20 मालिकेत वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देऊ शकते. विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना टी-20 मालिकेत विश्रांती दिली जाऊ शकते. अशा स्थितीत एखाद्या खेळाडूला भारताचा T20 संघाचा कर्णधारपद सोपवलं जाऊ शकतं. 


या खेळाडूच्या खांद्यावर कर्णधारपदाची कमान?


BCCI ने न्यूझीलंड विरुद्ध सीरिजसाठी के एल राहुल तात्पुरता कर्णधार असावा यावर चर्चा केली. के एल राहुल IPL मध्ये पंजाब किंग्जचा कर्णधार आहे. BCCI ने टीम इंडियाच्या काही दिग्गज क्रिकेटपटूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. यामागचं कारण टीम इंडिया इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सीरिजपासून टी-20 वर्ल्ड कपपर्यंत आरामच मिळालेला नाही. 


BCCI च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एएनआयला दिलेल्या वृत्तानुसार, 'वरिष्ठ खेळाडूंना थोडा वेळ आरामाची गरज आहे. यात लपवण्यासारखे काहीही नाही की के एल राहुल हा टी-20 फॉरमॅटचा महत्त्वाचा भाग आहे. त्याच्याकडे कर्णधारपद सोपवले जाण्याची शक्यता आहे.


टी 20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडिया खेळाणार मोठी सीरिज


भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 17 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर दरम्यान तीन सामन्यांची टी-20 सीरिज खेळवली जाणार आहे. T20 सीरिज संपल्यानंतर भारतीय संघ 25 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान 2 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळला आहे. 


न्यूझीलंड विरुद्ध टी 20 सीरिज शेड्युल


1. पहिला टी20 आंतरराष्ट्रीय सामना -  17 नोव्हेंबर 2021 - संध्याकाळी 7 वाजता


2. दुसरा टी20 आंतरराष्ट्रीय सामना -  19  नोव्हेंबर 2021 - संध्याकाळी 7 वाजता


3. तिसरा टी20 आंतरराष्ट्रीय सामना- 21  नोव्हेंबर  2021 - संध्याकाळी 7 वाजता