Ind vs Pak Asia Cup 2023: `एशिया कपचं ठिकाण बदललं तर...` पाकिस्तानची भारताला धमकी
पाकिस्तानमध्ये 2023 मध्ये Asia Cup स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं, तर याच वर्षी भारतात एकदिवसीय World Cup स्पर्धे होणार आहे...
India vs Pakistan Asia Cup 2023: एशिया कप 2023 स्पर्धेच्या आयोजनावरुन पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) चांगलंच बिथरलं आहे. एशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडिया (Team India) पाकिस्तानात (Pakistan) जाणार नाही, हे आधीच भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) स्पष्ट केलं आहे. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये (ODI World Cup) न खेळण्याची धमकी दिली आहे.
भारतीय क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानात न जाण्याची भूमिका घेतल्याने एशिया कप 2023 स्पर्धा पाकिस्तानातून इतर देशात खेळवण्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चांगलंच संतापलं असून पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा (Ramij Raja) यांनी बीसीसीआयला (BCCI) धमकीच दिली आहे.
पीसीबीची बीसीसीआयला धमकी
भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तान यायचं नसेल तर त्यांनी येऊ नये, पण एशिया कप स्पर्धा पाकिस्तानात खेळवण्यात आली नाही तर या स्पर्धेतून पाकिस्तान क्रिकेट संघ बाहेर पडेल. पीसीबी कोणत्याही परिस्थितीत एशिया कप स्पर्धेचं आयोजन आपल्या हातातून घालवू इच्छित नाही. पाकिस्तान आणि इंग्लंड (Pakistan vs England) दरम्यान रावळपिंडी इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटीदरम्यान रमीझ राजा यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : आईने पोटच्या मुलाला घरातून हाकलून दिलं, आज तोच बनला देशातला पहिला ट्रान्सजेंडर पायलट
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने निष्पक्ष पद्धतीने या स्पर्धेच्या आयोजनाचा मान मिळवला आहे. या स्पर्धेचं आयोजन करण्यास पीसीबी समर्थ असल्याचं रमीझ राजा यांनी म्हटलंय. भारती संघाला पाकिस्तानात यायचं नसल्यास ते त्यांचा निर्णय घेऊ शकतात. पण पाकिस्तानातून एशिया कप बाहेर गेल्यास पीसीबीलाही गंभीर निर्णय घ्यावा लागेल, असंही रमीझ राजा यांनी सांगितलं.
इतकंच नाही तर भरातीय क्रिकेट संघ एशिया कप स्पर्धेसाठी पाकिस्तानात आला नाही, तर पाकिस्तान क्रिकेट संघही भारतात होणाऱ्या एकदिवीस वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होणार नाही. पाकिस्तान एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये खेळला नाही तर ती स्पर्धा कोण बघेल अशी दर्पोक्तीही रमीझ राजा यांनी केली आहे. काहीही झालं तरी आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असल्याचं रमीझ राजा यांनी स्पष्ट केलं आहे.
हे ही वाचा : भिडे मास्तरांच्या जमान्यातील सायकलचं बील Viral, 88 वर्षांपूर्वी इतकी होती किंमत
14 वर्ष पाकिस्तान दौरा नाही
भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या राजकीय तणावपूर्ण परिस्थितीमुळे भारत आणि पाकिस्तानदरम्यान क्रिकेट मालिका खेळली गेलेली नाही. 2012 मध्ये भारत आणि पाकिस्तान सीरिज खेळवण्यात आली होती. तेव्हा पाकिस्तान क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला होता. तर गेली चौदा वर्ष भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. 2008 मध्ये एशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानात गेला होता.