Ind vs Pak: भारत-पाक `सुपर-4` सामन्यात पुन्हा पाऊस आला तर...; ACC कसा लावणार निकाल, पाहा
India vs Pakistan, Asia Cup Super 4 : पाकिस्तानविरूद्धच्या सामना पावसाने रद्द करण्यात आला. तर नेपाळविरूद्धच्या सामन्यात ओव्हर्स कापण्यात आले. त्यामुळे आता चाहत्यांच्या मनात प्रश्न असा उपस्थित झालाय की, सुपर 4 च्या सामन्यांमध्येही पावसाने खेळ केला तर काय होणार?
India vs Pakistan, Asia Cup Super 4 : नेपाळला पराभूत करून टीम इंडियाने एशिया कपमध्ये ( Asia Cup 2023 ) सुपर 4 चं तिकीट पक्क केलं आहे. यावेळी 10 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan ) एकमेंकांविरोधात मैदानात उतरणार आहेत. मुख्य म्हणजे भारताच्या दोन्ही सामन्यांमध्ये पावसाने व्यत्यय आणला होता. पाकिस्तानविरूद्धच्या सामना पावसाने रद्द करण्यात आला. तर नेपाळविरूद्धच्या सामन्यात ओव्हर्स कापण्यात आले. त्यामुळे आता चाहत्यांच्या मनात प्रश्न असा उपस्थित झालाय की, सुपर 4 च्या सामन्यांमध्येही पावसाने खेळ केला तर काय होणार?
सामन्यांच्या वेन्यूमध्ये झाला बदल
एशियन क्रिकेट काऊंसिलने सतत येणाऱ्या पावसाचा मुद्दा लक्षात घेता, सुपर 4 सामन्यांना दुसऱ्या जागी शिफ्ट करण्यात आलं आहे. यावेळी सामन्यांमध्ये पावसाचा व्यत्यय येऊ नये म्हणून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, कोलंबोच्या के आर प्रेमदासा स्टेडियममध्ये 9 सप्टेंबरपासून खेळवले जाणारे सामने आता हम्बनटोटा मध्ये खेळवण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे एशिया कपचा ( Asia Cup 2023 ) फायनल सामना देखील हम्बनटोटामध्येच खेळवला जाणार आहे.
रिझर्व डे च्या दिवशी खेळवणार सामना
दरम्यान इनसाइडस्पोर्टच्या अहवालानुसार, जर 10 सप्टेंबर रोजीच्या भारत पाकिस्तान ( India vs Pakistan ) सामन्यात पाऊस आला तर या सामन्यासाठी रिझर्व डे ( Reserve Day ) ठेवण्यात आला आहे. जर पावसामुळे 10 सप्टेंबर रोजी हा सामना खेळवता आला नाही, तर तो 11 तारखेला खेळवण्यात येणार आहे.
लागोपाठ भारताला खेळावे लागू शकतात सामने
जर पाकिस्तानविरूद्धचा सामना पावसामुळे 11 तारखेला खेळवला गेला. तर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 तारखेला टीम इंडियाला पुन्हा सामना खेळायचा आहे. 12 तारखेला टीम इंडियाला ग्रुप बी मध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या टीमसोबत सामना खेळायचा आहे.
2 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात पाऊस अडथळा ठरला. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात टीम इंडियाने फलंदाजी केली. मात्र यावेळी पाकिस्तानच्या खेळाडूंना फलंदाजी करता आली नाही. सतत पाऊस पडत असल्याने हा रद्द केला. मुळात भारत-पाकिस्तान सामन्यात पावसाने खेळ केल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला. मात्र आता पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान सामना रंगणार असून पावसाचा विचार करून या सामन्यासाठी रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे.