मुंबई : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या अंडर १९ वर्ल्डकपमध्ये सुपर लीग सेमीफायनल सामन्यात आज भारत-पाकिस्तान मध्ये सामना रंगणार आहे. भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत सेमीफायनलमध्ये आपली जागा पक्की केली होती. तर शुक्रवारी झालेल्या क्वार्टर फायनलमध्ये पाकिस्तानने अफगाणिस्तानचा ६ विकेटने पराभव केला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेटच्या इतिहास भारत-पाकिस्तान मधील सामना नेहमीच उत्सूकतेचा ठरला आहे. जगभरात या सामन्याबाबत उत्सूकता असते. जी टीम आजचा सामना जिंकेल ती टीम वर्ल्डकपच्या फायनलमध्ये जाणार आहे. भारताने आतापर्यंत चार वेळा अंडर19 वर्ल्‍डकप  जिंकला आहे. यंदा ही भारतीय टीम प्रबळ दावेदार मानली जात आहे. बॅटींग आणि बॉलिंग मध्ये भारतीय टीम पाकिस्तानच्या तुलनेत मजबूत मानली जात आहे.


अंडर 19 वर्ल्‍डकप (U19 World Cup) भारत आणि पाकिस्तान दहाव्यांदा एकमेकांसमोर असणार आहे. आतापर्यंत भारताने ५ वेळा पाकिस्तानला पराभूत केलं आहे. 


भारत-पाकिस्तान सामन्यांचा इतिहास


अंडर19 वर्ल्‍डकप 1988:  पाकिस्‍तानने 68 रनने सामना जिंकला होता.
अंडर19 वर्ल्‍डकप 1998:  भारताने 5 विकेटने सामना जिंकला होता.
अंडर19 वर्ल्‍डकप 2002:  पाकिस्‍तानने 2 विकेटने सामना जिंकला होता.
अंडर19 वर्ल्‍डकप 2004 : पाकिस्‍तानने 5 विकेटने सामना जिंकला होता.
अंडर19 वर्ल्‍डकप 2006:  पाकिस्‍तानने 38 रन सामना जिंकला होता.
अंडर19 वर्ल्‍डकप 2010:  पाकिस्‍तानने 2 विकेटने सामना जिंकला होता.
अंडर19 वर्ल्‍डकप 2012 : भारताने एक विकेटने सामना जिंकला होता.
अंडर19 वर्ल्‍डकप 2014:  भारताने 40  रन सामना जिंकला होता.
अंडर19 वर्ल्‍डकप 2018 : भारताने 203 रनने मोठा विजय मिळवला होता.


भारत-पाकिस्तानमधील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरु होणार आहे.