विशाखापट्टणम : मोहालीत श्रीलंकेला धूळ चारत टीम इंडियाने तीन मॅचच्या वनडे सीरीजमध्ये कमबॅक केले. आता तिसरी आणि अखेरची वनडे विशाखापट्टणमच्या मैदानावर आज रंगणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फलंदाजांची चांगली कामगिरी पाहता भारतीय संघाचे पारडे जड दिसतेय. कसोटी मालिका गमावल्यानंतर वनडे मालिकेत विजय मिळवण्याच्या इराद्याने श्रीलंकेचा संघ आज मैदानात उतरणार आहे.


तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीत आहेत. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात कोण विजयी होणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय.


२०१५ च्या ऑक्टोबरनंतर भारत घरच्या मैदानावर दोन देशातील कोणतीही सीरिज हरलेला नाही. त्यामुळे श्रीलंकेला तिस-या वनडेत नमवत सीरिज खिशात घालण्याच्या इराद्यानेच टीम इंडिया मैदानात उतरेल. 


अजिंक्य रहाणे खेळणार का ?


 भारताकडून धवन, रोहित, श्रेयस अय्यर, धोनी यांनी पहिल्या दोन वनडेत रन्स केल्यात. मात्र मिडल ऑर्डरला फार काही चमक दाखवू शकलेली नाही. त्यामुळे तिस-या वनडेत मनीष पांडेच्या जागी अजिंक्य रहाणेचा समावेश होतो का हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल. 


धोनीला १०२ रन्सची गरज 


 याशिवाय सा-यांच्या नजरा महेंद्रसिंह धोनीवर असेल. वनडेत दहा हजारी रन्सचा टप्पा पार करण्यासाठी त्याला आणखी १०२ रन्सची गरज आहे. दुसरीकडे श्रीलंकेला या मॅचमध्ये चांगली कामगिरी करत भारताला धक्का देण्याची ही सुवर्णसंधी आहे. 



मोहालीमध्ये झालेल्या सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला होता. कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात शानदार द्विशतक झळकावले होते. त्याच्या द्विशतकांच्या जोरावर भारताने दुसऱ्या सामन्यात विजयी होत मालिकेत बरोबरी साधली. 


भारताने या मैदानात सात सामने खेळलेत. त्यापैकी एकाच सामन्यात त्यांना हार पत्करावी लागलीये. त्यामुळे विजयाची ही लय या सामन्यातही कायम ठेवण्याचा प्रयत्न भारतीय संघ करेल. 


सामन्याची वेळ - दुपारी दीड वाजता


भारत :- रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, श्रेयस अय्यर , दिनेश कार्तिक, मनीष पांडे, एम एस धोनी, हार्दिक पंड्या, एम एस वाशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमरा, कुलदीप यादव, अजिंक्य रहाणे, अक्षर पटेल, सिद्धार्थ कौल.


श्रीलंका :- थिसारा परेरा  (कर्णधार) , उपुल थरंगा, धनुष्का गुणतिलका, लाहिरू तिरिमन्ने, असेला गुणरत्ने, सदीरा समरविक्रमा, निरोशन डिकवेला, धनंजय डिसिल्वा, अँजेलो मॅथ्यूज, सचित पतिराना, सुरंगा लकमल, नुवान प्रदीप, अकिला धनंजया, चतुरंगा डिसिल्वा, दुष्मंता चामिरा, कुशल परेरा..