Mohammed Siraj : नेमकी चूक कोणाची? अंपायरची की सिराजची? VIDEO पाहून तुम्हीच सांगा!
India vs South Africa: LIVE मॅचमध्ये सिराजने घातला अंपायरशी वाद!
IND vs SA, Mohammed Siraj : रांचीमध्ये खेळल्या जात असलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील वनडे सामन्यात नवा वाद पाहायला मिळाला आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) मैदानावर अंपायरशी बाचाबाची केल्याचं दिसून आलं. मोहम्मद सिराजच्या या कृत्यामुळे क्रिडाविश्वात जोरदार चर्चा सुरू असल्याचं पहायला मिळतंय. नेमकी चूक कोणाची? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय. (india vs south africa 2nd odi match mohammed siraj argument with umpire)
LIVE मॅचमध्ये अंपायरशी घातला वाद -
शिखर धवनने (Shikhar Dhawan) दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 48 वं षटक टाकण्यासाठी मोहम्मद सिराजकडे बॉल सोपवला. मोहम्मद सिराजच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज केशव महाराजला फटका बसला आणि चेंडू यष्टीरक्षक संजू सॅमसनकडे (Sanju samson) गेला. त्यानंतर संजूने बॉल पुन्हा सिराजकडे फेकला.
संजू सॅमसनने फेकलेल्या चेंडू सिराजने (Mohammed Siraj) पकडला. त्यावेळी नॉन स्टाईक एन्डवर असलेला मिलर क्रीझसोडून पुढे आला होता. डेव्हिड मिलरला (David Miller) धावबाद करण्याच्या प्रयत्नात मोहम्मद सिराजने जोरदार थ्रो मारला. मोहम्मद सिराजचा स्टंप चुकला आणि बॉल बाँड्री पार गेला. त्यानंतर अंपायरने (umpire) फोर दिला.
अंपायरच्या निर्णयावर मोहम्मद सिराज चांगलाच संतापला. त्यानंतर त्याने थेट अंपायरशी वाद घातला. सिराजचं रुद्ररूप पाहून कर्णधार शिखर धवनने मध्यस्थी केली आणि वाद शमवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अंपायरने शिखर धवनला नियम समजून सांगितला.
पाहा व्हिडीओ-
नेमकी चूक कोणाची?
झालेल्या प्रकारानंतर नेमकी चूक कोणाची?, कोण बरोबर कोणाचं चुकलं?, असा प्रश्न आता विचारण्यात येत आहे. डेव्हिड मिलरने क्रीझ सोडल्याने सिराजने केलेला थ्रो बरोबर होता, असं क्रिडा विश्लेषकांनी म्हटलंय. मात्र, अंपायरने फोर दिल्यानंतर सिराजने वाद घालणं अपेक्षित नव्हतं, असंही सांगितलं जातंय. त्यामुळे व्हिडीओ पाहून तुम्हीच ठरवू शकता, कोण बरोबर? सिराज की अंपायर?