मुंबई : टीम इंडियाने कसोटीसोबत वन डे सामनाही गमवला आहे. याच सोबत आणखी एक मोठा धक्का चाहत्यांना बसण्याची शक्यता आहे. सध्या रोहित शर्मा दुखापतीमुळे सध्या मैदानावर नाही. त्यामुळे कर्णधारपदाची तात्पुरती जबाबदारी के एल राहुलवर आहे.  राहुल कर्णधार म्हणून सपशेल अपयशी ठरला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता या मालिकेनंतर रोहित शर्मा पुन्हा मैदानात खेळताना दिसणार आहे. वेस्ट इंडिज दौऱ्याआधी तो फिट होईल असं सांगितलं जात आहे. त्यामुळे के एल राहुलकडून तात्पुरतं दिलेलं कर्णधारपद काढून घेतलं जाणार आहे. त्याचवेळी, केएल राहुलच्या नेतृत्वाखाली संघात असा खेळाडू आहे, ज्याला कर्णधार रोहित येताच बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. 


रोहित शर्मा लवकरच वन डे आणि टी 20 चं कर्णधारपद आपल्याकडे घेऊन मैदानात परत खेळण्यासाठी उतरणार आहे. के एल राहुलने ज्याला आपल्या नेततृत्वामध्ये तारलं त्या खेळाडूवर कदाचित टांगती तलवार लागण्याची शक्यता आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून संघाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर आहे. 


दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये अय्यरची कामगिरी अत्यंत खराब झाली. श्रेयस अय्यरमुळे सूर्यकुमार यादवला संघात खेळण्याची संधी देण्यात आली नाही. रोहित कदाचित अय्यर ऐवजी सूर्यकुमारला प्राधान्य देण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अय्यरला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावं लागू शकतं. 


वन डे सामन्यात श्रेयस अय्यर विशेष कामगिरी करू शकला नाही. दोन्ही सामन्यात तो फ्लॉप ठरला. तर के एल राहुलचा अय्यरला संघात घेण्याचा निर्णय देखील चुकल्याची टीका होत आहे. त्यामुळे आता श्रेयस अय्यर ऐवजी सूर्यकुमारला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. 


रोहितचा श्रेयसपेक्षा सूर्यकुमारच्या बॅटिंगकडे जास्त कल आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली सूर्यकुमार यादव दीर्घकाळापासून मुंबई इंडियन्सकडून आयपीएल खेळत आहे. यंदाच्या लिलावापूर्वी सूर्याला मुंबई इंडियन्सने कायम ठेवले आहे. रोहित येताच तो श्रेयसच्या जागी सूर्यकुमार यादवला संधी देऊ शकतो


सूर्यकुमार यादवने दीर्घकाळ संघात स्वत:ला सामावून घेतल्यास श्रेयस अय्यरची कारकीर्द धोक्यात येऊ शकते. दिल्ली संघानेही श्रेयस अय्यरला रिटेन केलं नाही. श्रेयस अय्यर आता पुन्हा जर प्लॉप ठरला तर मात्र त्याच्या करियरला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता येत्या काळात रोहित शर्मा काय निर्णय घेणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.