नवी दिल्ली :  टीम इंडिया स्टार फलंदाज ईशान किशनने पहिल्याच सामन्यात तुफानी खेळी करत अर्धशतक साजरे केले आहे.  ईशान किशनने 9 चौकार आणि 1 षटकार लगावून ही तूफानी खेळी केली आहे. 37 बॉल्समध्ये त्याने अर्धशतक झळकावले आहे.  त्यांच्या या खेळीने भारत दक्षिण आफ्रिकेसमोर एक मोठी धावसंख्या उभारू शकणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकत फिल्डींगचा निर्णय घेतला होता, तर टीम इंडियाला प्रथम बॅटिंगला उतरली होती. ईशान किशन 48 बॉल्समध्ये 76 धावा करून आऊट झाला आहे. या अर्धशतकी खेळीत त्याने 11 चौकार आणि 3 षटकार ठोकले आहेत. तर ऋुतुराज गायकवाडने 15 बॉल्समध्ये 23 धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यरने 35 आणि रिषभ पंत 9 धावावर खेळतोय. 


भारताच्या 150 धावा पूर्ण झाल्या आहेत. 15 ओव्हरमध्ये भारताने ही धावसंख्या गाठलीय. आता पूढच्या 5 ओव्हरमध्ये भारत किती मोठी धावसंख्या करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.