IND vs SA T20 Series : शुभमन गिल.. टीम इंडियाचा सध्याचा हुकमी युवा सलामीवीर. एकदिवसीय आणि कसोटी  क्रिकेटमध्ये शुभमन गिलने (Shubman Gill) दमदार कामगिरी केली आहे. नुकत्याच झालेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतही शुभमन गिलने सलामीला येत जबदरस्त फलंदाजी केली. शुभमन गिलची फलंदाजी तंत्रशुद्ध आणि अचून टायमिंग आहे. पण टी20 क्रिकेटमध्ये मात्र त्याच्या बॅटमधून धावा निघत नसल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. बोटावर मोजण्याइतक्या इनिंग सोडल्यास शुभमन गिलला टी20 क्रिकेटमध्ये (T20 Cricket) मोठी कामगिरी करता आलेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिकेत फ्लॉप
दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत शुभमन गिल सपशेल अपयशी ठरला आहे. पहिल्या सामना पावसामुळे रद्द झाला. तर दुसऱ्या सामन्यात गिल भोपळाही न फोडता पॅव्हेलिअनमध्ये परतला. तिसऱ्या सामन्यातही तो केवळ 12 धावा करुन बाद झाला. शुभमन गिल भारतासाठी (Team India) आतापर्यंत एकूण 12 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. यात सलामीला फलंदाजी करताना त्याने 27.63 च्या अॅव्हरेजने केवळ 304 धावा केल्या आहेत. टी20 क्रिकेटमध्ये गिलच्या नावावर एक शतकही आहे. 126 धावांची त्याने शानदार खेळी केली आहे. पण याव्यतिरिक्त इतर सामन्यात तो फ्लॉप ठरलाय. म्हणजे 11 सामन्यात त्याला केवळ 181 धावा करता आल्या आहेत. 


दुहेरी आकडा गाठतानाही दमछाक
टी20 क्रिकेटमध्ये शुभमन गिलची धावांचा दुहेरी आकडा गाठतानाही दमछाक होतेय. 12 टी20 सामन्यांपैकी आठ सामन्यात गिलने 10 धावांचा आकडाही पार केलेला नाही. 3 सामन्यात गिलने 249 धावा केल्या. म्हणजे नऊ सामन्यात शुभमन गिलला केवळ 55 धावा करता आल्या आहेत.


टी20 विश्वचषकासाटी संघात जागा मिळणार?
दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या दोन्ही सामन्यात शुभमन गिल अपयशी ठरला आहे. टी20 क्रिकेटमध्ये सलामीच्या फलंदाजीसाठी यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड यांचं कडवं आव्हान त्याच्यासमोर आहे. ऋतुराज आणि यशस्वी टी20 सामन्यात खोऱ्याने धावा करतायत. त्यामुळे टी20 विश्वचषकासाठी त्यांची दावेदारी मजबूत आहे. अशात शुभमन गिलचं टी20 विश्वचषकात खेळण्याचं स्वप्न तुटू शकतं.