नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान पहिली कसोटी आजपासून सुरु होत आहे. विशाखापट्टणम इथं पहिली कसोटी रंगणार आहे. या कसोटीत रोहित शर्मा प्रथमच सलामीसाठी उतरेल. आर. अश्विनचं कसोटी संघात पुनरागमन झालं आहे. तर रिषभ पंतऐवजी वृद्धिमान साहा आजच्या कसोटीसाठी मैदानात उतरेल. पहिली टी-२० मालिका बरोबरीत राहिली होती. आता तीन कसोटी मालिकेत विजय मिळवण्याच्या इराद्यानच कोहली एँड कंपनी मैदानात उतरेल. दरम्यान ढगाळ आकाश आणि हलक्या सरी यामुळे पहिल्या कसोटीवरही चिंतेचे सावट निर्माण झालं आहे.


सचिनची प्रतिक्रिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


टेस्ट चॅम्पियनशीपमुळे टीमचा उत्साह वाढेल कारण प्रत्येक टीम जास्त पॉईंट मिळवण्याचा प्रयत्न करेल. यामुळे प्रेक्षकांमध्येही उत्साह येईल. टेस्ट चॅम्पियनशीपचे शेवटचे ६ महिने आणखी रोमांचक असतील, अशी प्रतिक्रिया सचिन तेंडुलकरने दिली आहे.


दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये मागच्या काही काळात टेस्ट खेळलेले कमी बॅट्समन असले तरी त्यांची बॅटिंग चांगली आहे. भारतीय बॉलरना एसजी बॉल कसा वापरायचा हे माहिती आहे. सुरुवातीच्या ओव्हरनंतर या बॉलने खेळणं कठीण होतं. या वातावरणाचा भारतीय बॉलर कसा वापर करतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे, असं सचिन म्हणाला.


पांड्याला पाठदुखी


ऑलराऊंडर हार्दिक पांड्याची पाठदुखी पुन्हा वाढली आहे. या दुखापतीमुळे हार्दिक पांड्याला बराच कालावधी क्रिकेटच्या मैदानापासून लांब राहावं लागू शकतं. पाठदुखीवर उपचार घेण्यासाठी हार्दिक पांड्या बुधवारी इंग्लंडला रवाना होणार आहे. पाठीच्या दुखापतीसाठी हार्दिक तिसऱ्यांदा इंग्लंडला जात आहे. मागच्या काही दिवसांमध्ये दुखापतीमुळे टीम इंडिया बाहेर गेलेला हार्दिक पांड्या हा दुसरा खेळाडू आहे. याआधी जसप्रीत बुमराह कंबरेला फ्रॅक्चर झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमधून बुमराहला माघार घ्यावी लागली होती.