भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका आज तिसरी वन-डे
भारत-दक्षिण आफ्रिकेदरम्यान आज तिसरी वन-डे होत आहे. दुखापतींमुळे ग्रासलेल्या यजमानांविरोधात केपटाऊन जिंकण्याची विराट कोहली सेनेला चांगली संधी आहे.
केपटाऊन : भारत-दक्षिण आफ्रिकेदरम्यान आज तिसरी वन-डे होत आहे. दुखापतींमुळे ग्रासलेल्या यजमानांविरोधात केपटाऊन जिंकण्याची विराट कोहली सेनेला चांगली संधी आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना केपाटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर रंगणार आहे. भारतीय संघ मालिकेत २-०ने आघाडीवर आहे.
तर यजमान आफ्रिकनं संघ विजयाच्या शोधात आहे. आता दुखापतींनी ग्रासलेला आफ्रिकन संघ मालिकेत पुनरागमन करतो की, भारतीय संघ ३-०ने आघाडी घेतो याकडेच क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.