Ind vs Sa : वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचं शेड्यूल ठरलं; `या` तारखेपासून दक्षिण आफ्रिकेचा दौरा
Ind vs Sa : आता टीम इंडियाचं वर्ल्डकप नंतरचं शेड्यूल देखील जाहीर करण्यात आलंय. वर्ल्डकप नंतर म्हणजेतच डिसेंबरमध्ये टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या ( South Africa tour ) दौऱ्यावर जाणार आहे.
Ind vs Sa : यंदाच्या वर्षी टीम इंडियाला ( Team India ) ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वर्ल्डकप खेळायचा आहे. हा वर्ल्ड कप ( ICC World cup ) भारतात खेळवला जाणार असून टीम इंडियाचे खेळाडू यासाठी आतापासूनच तयारी करत आहेत. अशातच आता टीम इंडियाचं वर्ल्डकप नंतरचं शेड्यूल देखील जाहीर करण्यात आलंय. वर्ल्डकप नंतर म्हणजेतच डिसेंबरमध्ये टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या ( South Africa tour ) दौऱ्यावर जाणार आहे.
कसा असणार दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा दौरा
डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 मध्ये हा दौरा असणार आहे. या ठिकाण टीम इंडियाला 3 टी-20 सामने, 3 वनडे सामने आणि 2 टेस्ट सामने खेळावे लागणार आहेत. यामध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एक टेस्ट बॉक्सिंग डे टेस्ट असणार आहे.
कसं आहे टीम इंडियाचं शेड्यूल?
पहिली T20I: रविवार, 10 डिसेंबर - हॉलीवूडबेट्स किंग्समीड स्टेडियम, डर्बन
दुसरी T20I: मंगळवार, 12 डिसेंबर - सेंट जॉर्ज पार्क, गकेबरहा
तिसरी T20I: गुरुवार, 14 डिसेंबर - डीपी वर्ल्ड वांडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
पहिली वनडे: रविवार, 17 डिसेंबर - बेटवे पिंक डे - डीपी वर्ल्ड वांडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
दुसरी वनडे: मंगळवार, 19 डिसेंबर - सेंट जॉर्ज पार्क, गकेबरहा
तिसरी वनडे: गुरुवार, 21 डिसेंबर - बोलंड पार्क, पारल
पहिली टेस्ट: 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर - सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन
दुसरी टेस्ट: 03 जानेवारी ते 07 जानेवारी - न्यूलँड्स क्रिकेट ग्राउंड, केपटाऊन